‘लालसिंग चड्ढा’चं चित्रीकरण अंतिम टप्प्यात, करीना-आमिरच्या प्रमुख भूमिकांमुळे चाहत्यांना उत्सुकता!

चित्रपटाच्या सेटवरील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

lal-singh-chadda
Photo- Aamir Khan and Kareena Kapoor Khan on the sets of Laal Singh Chaddha (Photos: Varinder Chawla)

अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेता आमिर खान प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ चे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या सेटवरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत अमीरने टी-शर्ट, पॅन्ट आणि डोक्यावर पगडी परिधान केली आहे. तर करीनाने हॉस्पिटल गाऊन घातलेल्याचे दिसून येत आहे.

करीनाने देखील तिच्या टीमसोबत अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले  होते. या फोटोला “लालसिंग चड्ढा आणि माझे प्रेमळ सहकारी”, अशा आशयाचे कॅप्शन दिले होते. तिने शेअर केलेल्या एका फोटोत ती मेकअप करताना दिसली होती. तर दुसऱ्या फोटोत ती कॅमेरासाठी पोझ देताना दिसली. या आधी आमिर खान या चित्रपटाचे शूटिंग लडाख  मध्ये करत होता त्यावेळेस त्याच्या सोबत पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव, अभिनेत्री मोना सिंग, अभिनेता नागा चैतन्य देखील होते. त्यानंतर त्यांचे हे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)


मागच्या वर्षी, करीनाने आमिर खानसोबत इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत, “प्रत्येक प्रवासाचा शेवट हा येतोच, आज माझ्या लालसिंग चड्ढा या आगामी चित्रपटाचे शूटिंग संपले, कोविड, माझी प्रेग्ननसी आणि भीती  हे सगळं असले तरी सगळी काळजी घेऊन शूट केले आहे”, अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. तसंच संपूर्ण टीमचे आभार देखील मानले आहेत. ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा रिमेक आहे.  या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. लॉकडाऊन नंतर आता राहिलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Amir khan kareena kapoor khan starts shooting for second installment of most awaited film lal singh chadda aad