काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रिया सेन विवाहबंधनात अडकली. बी-टाऊनमध्ये लग्नाचे वारे वाहत असतानाच आता त्यामध्ये आणखी एका जोडीची भर पडली आहे. अभिनेत्री अमिषा पटेलचा भाऊ अश्मितचा त्याची प्रेयसी मेहेक चहलशी नुकताच साखरपुडा झाला. दोघेही एकमेकांना गेल्या दहा वर्षांपासून ओळखत होते. त्यानंतर त्यांनी रिलेशनशीपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अश्मित आणि मेहेकने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. ‘ती हो म्हणाली!,’ असं कॅप्शन अश्मितने दिलं. तर मेहेकनंही फोटो शेअर करत अश्मितबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. १२ वर्षांच्या या नात्याबद्दल बोलताना मेहेक म्हणाली की, ‘माझ्यासाठी हे खूप आश्चर्यकारक होतं आणि त्याक्षणी मी स्तब्ध झाले. आम्ही युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होतो आणि त्याने ती अंगठी लपवली होती. रोमॅण्टिक सरप्राईज प्लॅन करुन त्याने माझं मन जिंकलं. मैत्रीपासून सुरु झालेल्या या नात्याचं प्रेमात रुपांतर झालं आणि आता आम्ही लग्न करणार आहोत.’

अश्मितनेही ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘अंगठीचं गुपित तिच्यापासून लपवणं खूप अवघड होतं. यासंदर्भात मी मित्र-मैत्रिणींशी फोनवरुन बोलताना हे सर्व तिच्या लक्षात येईल का अशी भीती मला वाटत होती. तिला प्रपोज करतानाचा क्षण माझ्या आयुष्यात नेहमीच एक सुंदर आठवण म्हणून राहिल.’

वाचा : ‘केबीसी’मुळे अशाप्रकारे बदललं पहिल्या विजेत्याचं आयुष्य; मात्र शोमुळे होऊ शकला नाही आयएएस

दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप ठरली नसली तरी पुढच्या सहा महिन्यात ते विवाहबद्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दोघेही सध्या युरोप टूरवर असून सोशल मीडियावर त्यांनी तेथील अनेक फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये स्पेनमधील एका रेस्तराँमध्ये प्रपोज करतानाचे फोटोदेखील आहेत. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये दोघांनीही भाग घेतला होता. चौथ्या सिझनमध्ये अश्मित आणि वीणा मलिकच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. तर मेहेक शोच्या पाचव्या सिझनमध्ये दिसली. त्यानंतर ‘पावर कपल’ या रिअॅलिटी शोमध्येही दोघांना पाहिलं गेलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amisha patel brother ashmit patel get engaged to his girlfriend maheck chahal
First published on: 19-08-2017 at 16:12 IST