ज्या कार्यक्रमामुळे अमिताभ बच्चन यांची कारकीर्द पुन्हा उभी राहिली तो लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. सोनी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आजही प्रेक्षक उत्सुक असतात. घरोघरी हा कार्यक्रम नित्यनेमाने पाहिला जातो. या कार्यक्रमाचं स्वरूप तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन हे स्पर्धकांना प्रश्न तर विचारतातच पण हा खेळ खेळताना ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत काही किस्सेसुद्धा सांगत असतात. असाच एक किस्सा नुकताच घडला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या भागात कोमल गुप्ता नावाची एक स्पर्धक हॉट सीटवर बसली होती. कोमल शिक्षणासोबत वेट लिफ्टिंगचा सरावही करते. वयाच्या ११ व्या वर्षापासूनच कोमलने वेट लिफ्टिंगचा सराव सुरू केला होता. या कार्यक्रमात कोमलने स्वतः याविषयी माहिती दिली. लहानपणी तिचे वडीलच तिला आखाड्यात घेऊन जायचे. कोमलने बरीच पदकं जिंकली आहेत. कोमलने तिच्या या प्रवासाबद्दल जेव्हा माहिती दिली तेव्हा अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्यांचा एक किस्सा शेअर केला.

बच्चनजी यांनी कोमलला ३००० रुपयांसाठी एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की, “‘साइन, कोसाइन और टॅनजेंट यांचा वापर मुख्यत्वेकरून कोणत्या क्षेत्रात होतो?” यासाठी पर्याय होते जैवविज्ञान, त्रिकोणमिति, पुरातत्व शास्त्र की रसायनशास्त्र. याचं उत्तर होतं त्रिकोणमिती आणि याच विषयाशी निगडीत बच्चन यांनी किस्सा सांगितला.

अमिताभ बच्चन म्हणाले “शाळेत गणित हा विषय माझा कच्चा होता, अर्थात शाळा कॉलेजमध्ये ते विषय मी शिकलो. पण त्यांचे फॉर्म्युला मला लक्षात ठेवणं कठीण जायचं. एवढंच नव्हे तर मला त्रिकोणमितिचं स्पेलिंगसुद्धा आठवत नसे. मी खूप हुशार आहे असा माझा गैरसमज होता आणि म्हणून मी बीएससी मध्ये शिक्षण घ्यायचं ठरवलं. पण माझी या विषयात अभ्यास करण्याची कधीच ओढ निर्माण झाली नाही. हा विषय खरोखरच कठीण आहे.”

आणखी वाचा : राम गोपाल वर्मा यांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत, म्हणाले “आमिरलाच हीट चित्रपटाचा फॉर्म्युला माहीत नाही, तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमिताभ बच्चन यांना मध्यंतरी करोना झाला होता. त्यातून बरे होऊन त्यांनी केबीसीचं चित्रीकरण पुन्हा सुरू केलं आहे. अमिताभ बच्चन लवकरच प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. शिवाय सुरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटासाठीसुद्धा बिग बी तयारी करत आहेत.