Amitabh Bachchan Latest Video : अमिताभ बच्चन वयाच्या ८२ व्या वर्षीही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी ब्लॉग लिहिणे, एक्सवर मजेदार पोस्ट करणे आणि चाहत्यांशी संपर्क साधणे कधीही थांबवले नाही.
अमिताभ बच्चन हे अशा बॉलीवूड स्टार्सपैकी एक आहेत, जे आजच्या तरुण स्टार्सपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहेत. आता त्यांनी इन्स्टाग्रामवरही त्यांची उपस्थिती नोंदवली आहे.
बिग बी यांनी अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो खूप चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यापूर्वी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये त्यांनी केशरी रंगाचे जॅकेट घातल्याचे दिसत आहे. सेल्फी स्टाईलमध्ये शूट केलेल्या या व्हिडीओमध्ये बिग बी अतिशय निरागसपणे म्हणतात की, ते इन्स्टाग्राम शिकत आहेत.
व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन काय बोलत आहेत?
व्हिडीओमध्ये बिग बी म्हणतात, “… तर मी इन्स्टाग्राम वापरायला शिकत आहे आणि मला खात्री आहे की, ते काम करेल….” व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. आता अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर खूप लोक कमेंटस् करीत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका वापरकर्त्याने लिहिले – इन्स्टाग्रामवर तुमचे स्वागत आहे आणि ते तुमच्यासाठी नक्कीच काम करेल. दुसऱ्याने लिहिले – क्या बात है. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले – Gen Z मध्ये तुमचे स्वागत आहे. चाहते आणि सेलिब्रिटी त्यांचे हार्ट इमोजीसह स्वागत करीत आहेत.

बिग बी यांचे इन्स्टाग्रामवर ३७.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत
अमिताभ बच्चन यांचे सोशल मीडियावर आधीच ३७.७ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण असे असूनही, त्यांना असे वाटते की, त्यांनी अजूनही बऱ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत. या वयात बहुतेक लोक तंत्रज्ञानापासून दूर राहतात, तर अमिताभ बच्चन व्हिडीओ, इन्स्टाग्राम रील्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मशी स्वतःला जोडण्यात व्यग्र आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ते शेवटचे ‘कल्की २८९८ एडी’मध्ये दिसले होते. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती १७’मध्ये होस्ट म्हणून दिसणार आहेत. ते २५ वर्षांपासून या क्विझ शोशी जोडलेले आहेत. ‘कौन बनेगा करोडपती १७’चा प्रीमियर ११ ऑगस्ट २०२५ रोजी सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर होईल. ‘कौन बनेगा करोडपती १७’चे एपिसोड सोनी लिव्हवर डिजिटल स्ट्रीम होतील.