बिग बी अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती १३’च्या मंचावर कायमच धमाल करताना दिसतात. मंचावर येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासोबतच सेलिब्रिटींसोबतही ते मनसोक्त गप्पा मारत शोला चार चाँद लावण्याचा प्रयत्न करत असतात. येणाऱ्या खास भागात रॅपर बादशहा हजेरी लावणार आहे. बिग बी आणि बादशहाचा एक खास फोटो बिग बींनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

बिग बींनी शेअर केलेल्या फोटोत त्यांचा हटके रॅपर लूक पाहायला मिळतोय. त्यांनी स्टायलिश गॉगल्स घातले आहेत. तर गळ्यातही त्यांनी अगदी रॅपर स्टाइलने काही मोठे लॉकेट असलेल्या चेन घातल्या आहेत. या फोटोवरून या खास भागात बादशहासोबत बिग बिंमधील रॅपर प्रेक्षकाच्या समोर येईल याचा अंदाज येतोय. त्यासोबत बिग बींनी काही तासांच्या अंतराने इन्स्टाग्रामवर आणखी एक फोटो शेअर केलाय. या फोटोसोबत त्यांनी एक रॅपही लिहिलंय. बादशहाच्या भेटीनंतर बिंग बींना हे रॅप सुचलेलं दिसतंय.

अभिनेत्री शुभांगी गोखले याचं फेसबुक अकाऊंट हॅक, ‘त्या’ लिंकवर क्लिक न करण्याचं आवाहन


फोटोसोबत पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “कुर्सी पे बैठ कर, चष्मा काला डाल कर, गले में सोना चांदी, जबरदस्ती मार कर, चले हैं रॅप करने हाथों को हिला कर….कपडे देखो रॉग्न है जी, ये गाणा फिर भी स्ट्रॉन्ग है जी…बिडीबी दा दा, दा दा….हर, मिला नही कोई वर्ल्ड मॅचिंग लगा कर…खेलेंगे केबीसी, जानते नही एबीसी, चलो बंद कर दो ये पोस्ट ताला मार कर”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिग बींनी तयार केलेल्या या रॅपवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत पसंती दिली आहे. नुकतीच सिद्धार्थ चतुर्वेदीने देखील ‘कौन बनेगा करोडपती १३’ मध्ये हजेरी लावली होती. यावेळी देखील त्याने एक रॅप सादर केलं होतं. त्यानंतर आता बादशहाचा कूल अंदाज येत्या शानदार शुक्रवारमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.