बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. नव्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच नव्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओमुळे नव्या चर्चेत आली आहे.
या व्हिडीओत नव्या सांगते की सेक्स संबंधीत प्रश्नांवर ती तिच्या आईशी म्हणजेच श्वेता बच्चनशी बोलू शकते. पण, मानवी शरीराला योग्य पद्धतीने जाणून घेण्यासाठी नव्या एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेली होती. तिथून परतल्यानंतर तिच्या मनात आणखी प्रश्न होते आणि ते विचारायला ती संकोच करत होती. यानंतर नव्याला तिची ‘आरा हेल्थ’ ही कंपनी सुरु करण्याची कल्पना सुचली. भारतीय महिला ‘अशा’ प्रश्नांमुळं कशा प्रकारे संकोचतात याची जाणीव तिला झाली होती.
आणखी वाचा : साडे सात वर्षांनी ‘या’ राशीचे लोक होणार साडेसाती पासून मुक्त
आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video
नव्याच्या या कंपनीच्या माध्यमातून लैंगिक शिक्षण, समज आणि गैरसमज, मासिक पाळी, लैंगिक संबंधांबाबतच्या गैरसमजुती या सर्व गोष्टींचं योग्य मार्गदर्शन केलं जातं. या विषयी व्हिडीओ शेअर करत नव्या सर्व भारतीय महिलांनी त्यांच्या शरीराला योग्य पद्धतीने जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचा सांभाळ केला पाहिजे अशी इच्छा असल्याचे, नव्याने सांगितले. नव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.