scorecardresearch

अमिताभ बच्चन यांनी कंगना रणौतच्या ‘धाकड’साठी केलेली पोस्ट डिलीट का केली? समोर आले कारण

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मात्र तिच्यासंबंधित एक पोस्ट डिलीट केल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत.

kangana ranaut, amitabh bachchan

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. तिला सिनेसृष्टीत दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. कंगना ही सध्या लॉकअप या शो चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्यानंतर आता लवकरच ती धाकड या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. पण बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मात्र तिच्यासंबंधित एक पोस्ट डिलीट केल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतंच कंगनाच्या ‘धाकड’ चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र काही तासांनी त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. त्यामुळे अनेक चाहत्यांना त्यांनी असे का केले असा प्रश्न पडला आहे.

रुग्णालयातून परतलेल्या मुमताज यांनी सांगितले आजाराचे कारण, म्हणाल्या “२५ वर्षांपूर्वी स्तनाच्या कर्करोगामुळे…”

अमिताभ बच्चन यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर कंगना रणौतबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी कंगनाचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या गाण्याचा टीझर शेअर केला होता. त्यासोबतच त्यांनी तिला शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यासोबत त्यांनी काही इमोजीही शेअर केले होते. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी कंगना रणौत, अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता आणि चित्रपटातील अन्य सदस्यांनाही टॅग केले होते.

मात्र त्यानंतर काही वेळाने बिग बींनी ही पोस्ट डिलीट केली. त्यांनी ही पोस्ट डिलीट का केली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावरुन काहींनी बिग बींना ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे.

अमिताभ बच्चन हे लवकरच करण जोहरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळेच त्यांनी ही पोस्ट डिलीट केली असावी, असे सांगितले जात आहे. मात्र अद्याप यामागचे कारण समोर आलेले नाही.

“आम्ही एकमेकांशी…”, शाहरुख खानसोबतच्या वादावर अजय देवगणने सोडले मौन

दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कियारा अडवाणीने कंगनाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. पण त्यानंतर काही वेळातच तिने ती पोस्ट डिलीट केली. त्यानंतर पुन्हा तिने काही वाक्य बरोबर करत ती पोस्ट पुन्हा शेअर केली होती. त्यावेळी कियाराने असे का केले? असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनी कंगनाशी संबंधित पोस्ट शेअर करुन डिलीट केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amitabh bachchan shares teaser for kangana ranaut song from dhaakad on instagram deletes it later nrp

ताज्या बातम्या