scorecardresearch

“आम्ही एकमेकांशी…”, शाहरुख खानसोबतच्या वादावर अजय देवगणने सोडले मौन

नुकतंच अजय देवगणने शाहरुख खानसोबतच्या वादावर स्पष्टीकरण दिले.

ajay devgan shahrukh khan

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेता शाहरुख खान हे दोघेही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यातील वाद हे सर्वांनाच माहिती आहेत. अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ आणि शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर पाहायला मिळाली. त्यानंतर त्या दोघांचे संबंध बिघडायला सुरुवात झाली. नुकतंच अजय देवगणने शाहरुख खानसोबतच्या वादावर स्पष्टीकरण दिले.

अजय देवगण हा सध्या त्याच्या रनवे ३४ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच त्याने एका प्रसिद्ध न्यूज पोर्टलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “बॉलिवूडमधील सहकलाकार आणि ९० च्या दशकात माझ्यासोबत कारकिर्द सुरु करणाऱ्या प्रत्येकाशी माझे चांगले जमते आणि आम्ही कायमच एकमेकांना मदत करतो.”

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…

“शाहरुख खान आणि माझ्याबद्दल मीडियामध्ये जे काही लिहिले जाते त्याचे अजिबात अस्तित्व नाही. आम्ही एकमेकांशी फोनवर बोलतो आणि आमच्यात सर्व काही ठिक आहे. आमच्यापैकी एकाला जरी अडचण आली तरी दुसरा त्याच्या पाठिशी कायम उभा राहतो. आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला कधीही अडचणींचा सामना करावा लागला नाही, असेही अजय देवगणने म्हटले.

यापुढे अजय देवगण म्हणाला, जेव्हा कधी सोशल मीडियावर चाहते एकमेकांशी भांडण करायला लागतात, तेव्हा ते दोन कलाकार एकमेकांशी भांडत आहेत असे समजले जाते. याच्या बातम्या झपाट्याने व्हायरल होतात. त्यामुळे मी सर्व चाहत्यांना सांगू इच्छितो की आपण सर्व एक आहोत. त्यामुळे तुम्ही कृपया भांडू नका.

“तू जे केलंस त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही…”, अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या २९ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रकुल प्रीत सिंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यानंतर आता अजय देवगण ‘दृश्यम 2’, ‘थँक गॉड’, ‘मैदान’, ‘भोला’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर शाहरुख खान हा ‘पठाण’, ‘डंकी’ या चित्रपटाव्यतिरिक्त दिग्दर्शक एटली यांच्या चित्रपटात काम करताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajay devgn denies fight rumours with shah rukh khan talks of their strong bond nrp

ताज्या बातम्या