scorecardresearch

अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“माझ्यासाठी शारीरिक, मानसिक तयारी करून त्या भूमिकेला…”, असेही कोल्हेंनी सांगितलं

अक्षय कुमारच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील शिवरायांच्या भूमिकेवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
अक्षय कुमार अमोल कोल्हे ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामधून मराठी सिनेविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२३ साली प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. त्या भेटीनंतर अमोल कोल्हे ‘एबीपी माझा’शी बोलत होते. तेव्हा त्यांना अक्षय कुमारच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले असता म्हणाले की, “गेली चौदा-पंधरा वर्षे मी अभिनय क्षेत्रात काम करतोय. बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यामुळे एखाद्या अभिनेत्याला केवळ भूमिका महत्वाची असू शकते.”

हेही वाचा : डोक्यावर टोपी, कपाळी टिळा अन्…; पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आमिर खानने केली पूजा, आरती करतानाचेही फोटो व्हायरल

“तर, काहीजण त्याकडे ड्रीम रोल म्हणून बगू शकतात. माझ्यासाठी शारीरिक, मानसिक तयारी करून त्या भूमिकेला सामोरं जाणे गरजेच असते. त्यामध्ये नैतिक जबाबदारी आहे, हे मी स्वत: समजतो. इतर कोणी काय करावे, हे मोठ्या अभिनेत्याला सांगू शकत नाही,” असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “मी ५ लाख घेतले पण…” फसवणुकीच्या आरोपावर अभिनेते सयाजी शिंदेंनी सोडलं मौन

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाल्याची माहिती होती. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीरेखेतील फोटो अक्षय कुमारने शेअर केला होता. हा फोटो लाखो लोकांनी पाहिला होता. पण, काहीजणांना अक्षय कुमारची व्यक्तीरेखा पसंत पडली नाही. त्यावरून अक्षय कुमारला ट्रोलही करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 15:05 IST

संबंधित बातम्या