बॉलिवूडमधील ‘परफेक्ट’ संस्कारी मुलगी म्हणून अभिनेत्री अमृता रावचे नाव नेहमीच घेतले जाते. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अब के बरस’ या चित्रपटातून अमृताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर इश्क विश्क, मै हूं ना, विवाह, हे बेबी यासारख्या चित्रपटात ती झळकली. मात्र त्यानंतर तिने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला. सध्या ती तिचा बहुतांश वेळ हा मुलासोबत आणि नवऱ्यासोबत घालवताना पाहायला मिळते. पण काही वर्षांपूर्वी अमृता रावला यशराज फिल्म्ससारख्या मोठ्या बॅनरची इन-हाउस अभिनेत्री बनण्याची संधी मिळाली होती. पण या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे मी यासाठी नकार दिला होता, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

अमृता सिंहने नुकतंच पती अनमोलसोबत एक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ त्यांनी कपल्स ऑफ थिंग्स या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृता राव आणि अनमोल त्यांच्या नात्याबद्दल आणि करिअरबद्दल बोलतांना दिसत आहेत. यावेळी तो म्हणाले की, “जेव्हा आम्ही श्रद्धा कपूरचा ‘लव का दी एंड’ चित्रपट पाहिला, तेव्हा अमृता खूप निराश झाली होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर अमृताला असे वाटले होते की यशराजसोबत इतका स्वच्छ कौटुंबिक चित्रपट करण्याची संधी मला का मिळाली नाही? मी त्याला पात्र आहे”. अमृताची निराशा पाहून अनमोल फार भावूक व्हायचा.

त्यानंतर काही महिन्यांनी २०११ मध्ये यश चोप्रा फिल्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आदित्य चोप्रा यांनी अमृता रावला मेसेज केला होता. आदित्य चोप्राने अमृताला मीटिंगसाठी ऑफिसमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर तिला यशराज फिल्म्सची इन-हाऊस हिरोईन बनण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यावेळी आदित्य चोप्राने तिला सांगितले की, “तू ‘विवाह’ सारखे कौटुंबिक चित्रपट केले आहेस. पण माझे चित्रपट हे फक्त कौटुंबिक नसतात. त्यात काही वेळा ऑनस्क्रीन किसिंग आणि बोल्ड दृश्यही असतात. जर तुला ते करण्यास काहीही हरकत नसेल तर तू यासाठी होकार दे आणि जर यासाठी तुझा नकार असेल तर तू स्पष्ट नाही म्हणून मला सांग.”

यानंतर आदित्य चोप्रांनी तिला सांगितले होते की जर तुझा यासाठी नकार असेल तर तू मेसेजवर फक्त नाही लिही, मी पुढे समजून जाईन. यानंतर अमृता रावने तिच्या मॅनेजरला याबद्दल सांगितल्यानतंरच यशराज फिल्म्सच्या बोर्डावर येण्याची घोषणा झाल्यानंतर तिला ब्रँड एंडोर्समेंट आणि चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.

यावेळी अमृता रावने बॉयफ्रेंड आरजे अनमोल आणि सूरज बडजातीयासोबत या ऑफरवर चर्चा केली. यावर बोलताना अमृता म्हणाली की “त्या दिवशी जेव्हा मी घरी परतले तेव्हा माझ्या मनात खूप गोंधळ उडाला होता. त्यावेळी मी विचार करत होते की मला हेच हवं होतं. मी ज्याच्या मागे इतके दिवस धावत होते ती गोष्ट आता समोर आली आहे. पण मला जाणवत आहे की मला जे हवं होतं ते हे नाही.”

Gangubai Kathiawadi : “ही तर दीपिकाची कॉपी…” पहिल्याच गाण्यानंतर आलियाच्या डान्सवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर अमृताने आदित्यला मेसेज केला होता की, ‘मी रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी याला न्याय देऊ शकणार नाही’. यानंतर आदित्य चोप्राला तिच्या या मेसेजचा अर्थ आणि तिचा निर्णय समजला. दरम्यान अमृताला यशराज फिल्म्सच्या ‘नील ए निक्की’ आणि ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटांची ऑफर मिळाली होती. मात्र किसिंग आणि बोल्ड सीन्समुळे तिने ही ऑफर नाकारली होती.