बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. फार कमी वेळात तिने बॉलिवूडमध्ये तिची खास ओळख निर्माण केली आहे. अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नुकतंच तिने इन्स्टाग्राम एका खास गिफ्टाचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोची आणि गिफ्टची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट एक फोटो शेअर केला आहे. यात ती एका सुंदर पोर्टेटसमोर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. हे पोर्टेट फार वेगळे आणि अनोखे असल्याचे पाहायला मिळत आहे. अनन्याने ही पोर्टेट फ्रेम तिच्या घराच्या भिंतीवर लावली आहे. विशेष म्हणजे ही फ्रेम तिला गिफ्ट म्हणून मिळाली आहे.

अनन्याला मिळालेली ही भेट फारच खास असल्याचे तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. बॉलिवू अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने तिला हे अनोखे पोर्टेट भेट म्हणून दिले आहे. अनन्याने त्या पोर्टेटप्रमाणेच पोज देत काढलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनन्याने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. हा फोटो शेअर करतेवेळी तिने धन्यवाद गौरी आंटी, माझ्यासाठी हे बनवल्याबद्दल, असे तिने म्हटले आहे.

दरम्यान गौरीने अनन्याला दिलेली ही भेट एक आर्टवर्क आहे. हे आर्टवर्क एक रंगेबेरंगी silhouette प्रकारातील आहे. यात एका महिलेचा चेहरा पाहायला मिळत आहे. यात अनेक आधुनिक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. हे एक मल्टीकलर पोर्टेट असल्याने ते दिसायला फार छान दिसत आहे. गौरीने अनन्याला दिलेली भेटवस्तू तिला प्रचंड आवडली आहे. तिने ‘आय लव्ह इट, स्टनिंग, वाह्’ असे म्हणत तिचा आनंद व्यक्त केला आहे.

अनन्या पांडेनं शेअर केले ग्लॅमरस फोटो, शाहिद कपूरची कमेंट चर्चेत

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान या दोघीही बेस्ट फ्रेंड आहेत. या दोन्ही स्टारकिड्सच्या पालकांचे देखील एकमेकांशी चांगले संबंध आहेत. सुहाना आणि अनन्या या लहानपणापासूनच्या एकमेकांच्या खास मैत्रिणी आहेत. सुहाना खानची आई गौरी खानसोबतही अनन्याचे चांगले संबंध आहेत. चंकी पांडे हा शाहरुख खानच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. त्यामुळे सुहाना, आर्यन हे अनन्या पांडेच्या खास मित्रांपैकी एक आहेत. ते अनेकदा एकत्र दिसतात.