Ananya pande will be playing lead role in dharma productions upcoming web series rnv 99 | चित्रपटांत अपयश मिळाल्यावर अनन्या पांडेची ओटीटीकडे वाटचाल, 'या' सिरीजमध्ये साकारणार मुख्य भूमिका | Loksatta

चित्रपटांत अपयश मिळाल्यावर अनन्या पांडेची ओटीटीकडे वाटचाल, ‘या’ सिरीजमध्ये साकारणार मुख्य भूमिका

तिने काम केलेला एकही चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही.

चित्रपटांत अपयश मिळाल्यावर अनन्या पांडेची ओटीटीकडे वाटचाल, ‘या’ सिरीजमध्ये साकारणार मुख्य भूमिका

बॉलीवूड स्टार्स सध्या त्यांच्या चित्रपटांबद्दल ‘बॉयकॉट‌ बॉलिवूड’ ट्रेंडमुळे गेले काही दिवस खूप चिंतेत आहेत. आतापर्यंत बरेच बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले आहेत. अगदी आमिर खान, अक्षय कुमार यांच्या चित्रपटांनाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला नाही. चित्रपटांच्या अयशस्वी कामगिरीमुळे अनेक कलाकारांचे करिअर पणाला लागले आहे आणि त्यातील एक म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे.

आणखी वाचा : उर्वशी रौतेलाचा बार्बी डॉल लूक, ड्रेसची किंमत ऐकून व्हाल आवाक्

तिने काम केलेला एकही चित्रपट फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला तिचा ‘लायगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. एका पाठोपाठ एक फ्लॉप चित्रपटांनंतर अनन्या आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याचे समोर आले आहे. परंतु इथेही तिला धर्मा प्रोडक्शनचाच आधार आहे. धर्मा प्रोडक्शन त्याच्या धर्मेटिक एंटरटेनमेंट या बॅनरखाली ‘कॉल मी बे’ या नावाची वेब सिरीज घेऊन येत आहे. ही सिरीज अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘दोस्ताना २’ चे दिग्दर्शक कॉलिन डी’कुन्हा या सिरिजचे दिग्दर्शन करणार आहेत असेही बोलले जात आहे.

हेही वाचा : तेलंही गेलं, तूपही गेलं अन्…, ‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशामुळे अनन्या पांडेच्या करिअरवर परिणाम

या सिरीजची कथा तीन लेखकांनी मिळून लिहिली आहे. या सिरीजमध्ये अनन्याला तिचा अभिनय दाखवण्याची पूर्ण संधी दिली जाणार आहे. तसंच या सिरीजची कथाही तिच्याभोवतीच फिरणार आहे. या सिरीजमध्ये ती एका श्रीमंत कुटुंबातील तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे जी एका मोठ्या घोटाळ्यात अडकते. श्रीमंत कुटुंबातील असल्याने तिला सामान्य जीवनाचा फारसा अनुभव नसतो. मग तिला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी काय काय करावं लागतं हे या सिरीजमध्ये दिसणार आजे. ही सिरीज २०२३ च्या उत्तरार्धात प्रदर्शित होईल. मात्र अद्याप या वेब सिरिजची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मला अनुभव आहे व्हिस्कीनंतर ट्विटर…” कपिल शर्माचा चियान विक्रमला खास सल्ला

संबंधित बातम्या

‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
“दीपाली सय्यद यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावली”, माजी स्वीय्य सहाय्यकाचे गंभीर आरोप; राज्यपालांवर
विश्लेषण : गुजरातमध्ये भाजपासाठी केलेलं ‘ते’ भाषण भोवलं! परेश रावल यांच्याविरोधात FIR दाखल; जाणून घ्या नेमकं घडलं काय
Akshay Kumar as Shivaji Maharaj:अक्षयचा महाराजांचा लुक आणि बल्बचं झुंबर यांची सोशल मिडियावर चर्चा
‘पसूरी’, ‘श्रीवल्ली’ की ‘चांद बालियां’? पाहा कोणतं आहे २०२२ मधील सर्वात लोकप्रिय गाणं

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीसंबंधी कागदपत्रे सादर करा!; केंद्र सरकार, रिझव्‍‌र्ह बँकेला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
रायगडमध्ये युती-आघाडी जुळवताना कसरत; ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी
तालिबानने ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानमध्ये प्रथमच जाहीर फाशी
दिल्ली पालिकेत ‘आप’ची सत्ता; भाजपची १५ वर्षांची राजवट संपुष्टात, काँग्रेस आणखी क्षीण
कर्जे महाग!; रिझव्‍‌र्ह बँकेकडून रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ