प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली आणि अभिनेता ब्रॅड पिट हे एकेकाळचं हॉलीवूडमधील सर्वात चर्चेतलं जोडपं होतं. हॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्याने जवळजवळ १० वर्षे एकत्र घालवली. त्यानंतर अँजेलिना आणि ब्रॅडने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला होता. या जोडप्याला शिलोह नावाची मुलगी आहे. आता शिलोहमुळे पुन्हा एकदा हे दोघे चर्चेत आहेत.

अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांची मोठी मुलगी शिलोह जोली-पिट हिने तिच्या आडनावातून ‘पिट’ काढून टाकण्यासाठी कायदेशीर अर्ज केल्याचं कळत आहे. २७ मे रोजी शिलोह १८ वर्षांची झाली आणि त्यानंतर लगेच तिच्या आडनावासंदर्भात बातमी आली आहे. शिलोहला तिच्या नावात काही बदल करायचे आहेत. नावातून ‘पिट’ हटवण्यासाठी तिने याचिका दाखल केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शिलोह नॉवेल जोली-पिटने २७ मे रोजी लॉस एंजेलिसमधील काउंटी सुपीरियर कोर्टात तिचे नाव बदलून फक्त शिलोह नॉवेल ठेवण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

“मी शुबमन गिलला ओळखत नाही,” लग्नाच्या चर्चांवर स्पष्टच बोलली अभिनेत्री रिद्धिमा पंडित; म्हणाली, “मला वाटतंय..”

शिलोहच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने तिच्या वाढदिवशी ही याचिका दाखल केली होती. तिने सज्ञान होताच वडिलांचं नाव हटवण्याचा निर्णय घेतला आहे. शिलोहबद्दल ही बातमी समोर आल्यानंतर तिचे आणि वडील ब्रॅड पिट यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. २७ मे २००६ रोजी जन्मलेल्या शिलोहने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून तिच्या नावामधून ‘पिट’ हटवले आहे. आता तिने कायदेशीररित्या आडनाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

आई-वडील झोपल्यावर मध्यरात्री त्यांच्या खोलीत जायची जान्हवी कपूर, कारण सांगत म्हणाली…

फक्त शिलोह हिच नाही तर एंजेलिना व ब्रॅड यांची दुसरी लेक जहारा हिनेही आडनाव हटवलं आहे. ती तिचं नाव ‘जहारा मार्ले जोली’ असं लिहिते. शिलोहची विवियन नावाची १५ वर्षांची बहीण आहे, तिनेही आपल्या नावातून वडिलांचं आडनाव हटवलं आहे. ब्रॅडच्या तिन्ही मुलींनी आता आपल्या वडिलांचं पिट आडनाव न लावण्याचा निर्णय घेतला आहे.

हिरवी पैठणी, नाकात नथ अन् चंद्रकोर, Cannes च्या रेड कार्पेटवर मराठी लूकमध्ये अवतरलेली ‘ती’ कोण? जगभरात होतेय चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांची भेट २००४ मध्ये ‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’च्या शूटिंगदरम्यान झाली होती. ब्रॅडचं ‘फ्रेंड्स’ फेम जेनिफर ॲनिस्टनशी लग्न झालं होतं, पण अँजेलिनाला भेटल्यानंतर त्याने जेनिफरपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ब्रॅड आणि अँजेलिनाने २०१४ मध्ये लग्न केलं आणि त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ते विभक्त झाले. विमानात पतीबरोबर भांडण झाल्यानंतर ऑगस्ट २०१६ मध्ये अँजेलिनाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यानंतर दोघेही वेगळे झाले.