सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होऊ लागेल याचा नेम नाही. डान्सचे बरेचसे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. पण त्यातील ठराविक आपलं लक्ष वेधून घेतात. असाच एक डान्सचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेता अनिकेत विश्वासरावच्या सासूचा हा व्हिडीओ आहे. अनिकेतची पत्नी स्नेहा हिने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

स्नेहाने तिच्या आईचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘कोण म्हणेल की ही माझी आई आहे. माझ्यापेक्षा दहापटीने अधिक ऊर्जा आणि उत्साह तिच्यात आहे.’ ‘स्त्री’ चित्रपटातील ‘मिलेगी मिलेगी’ या गाण्यावर अनिकेची सासू डान्स करताना पाहायला मिळतेय. त्यांचा हा डान्स पाहून अनेकजण कौतुक करत आहेत.

गेल्या वर्षी अनिकेत व स्नेहा लग्नबंधनात अडकले. हे दोघं ‘हृद्यात वाजे समथिंग समथिंग’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. यापूर्वी अनिकेत बऱ्याच मालिका आणि चित्रपटांतून झळकला आहे. तर स्नेहासुद्धा स्वप्नील जोशीच्या ‘लाल इश्क’ या चित्रपटातून झळकली होती.