छोट्या पडद्यावरची लाडकी सून तेजश्री प्रधान आणि अनिकेत विश्वासराव हे दोघंही लवकरच एका विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हंगामा प्लेच्या ‘पॅडेड की पुशअप’ या कार्यक्रमातून दोघंही पहिल्यांदाच नवरा-बायकोची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबत किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णी यांच्या विनोदाची फोडणी ‘पॅडेड की पुशअप’ मध्ये पाहायला मिळणार आहे. किशोरी अंबिये या अनिकेतच्या सासूच्या भूमिकेत आहे.

त्यामुळे विनोदाचा अफलातून तडका ‘पॅडेड की पुशअप’ ला असणार आहे. आपल्या बायको आणि सासूपासून एक गुपीत लपवण्याचा प्रयत्न करत असलेल्या नवऱ्याच्या भूमिकेत अनिकेत दिसणार आहे. हे रहस्य लपवताना अनेक विनोदी प्रसंग त्याच्या आयुष्यात घडत जातात. तेव्हा अशा मित्राला त्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिगरी दोस्ताच्या भूमिकेत सक्षम कुलकर्णी असणार आहे. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.