अखेर ५५ दिवसांनंतर अनिरुद्ध देवेला मिळाला डिस्चार्ज, केली करोनावर मात

सोशल मीडिया पोस्टद्वारे अनिरुद्धने दिली माहिती..

corona, corona virus, covid 19, aniruddh dave, shubhi ahuja, entertainment, entertainment news,

छोट्या पडद्यावरील ‘शक्ति – अस्तित्व के एहसास की’ या लोकप्रिय मालिकेत काम करणारा अभिनेता अनिरुद्ध दवेची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर प्रकृती खालावल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाहते अनिरुद्ध लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत होते. आता जवळपास ५५ दिवसांनंतर अनिरुद्धला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने चाहते आनंदी झाले आहेत.

अनिरुद्ध गेल्या काही दिवसांपासून भोपाळ येथील चिरायु मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. आता ५५ दिवसांनंतर त्याने करोनावर मात केली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो रुग्णालयातील स्टाफसोबत उभा असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : चाहतीच्या प्रेमात पडला अन् केलं लग्न, जाणून घ्या तमिळ सुपरस्टार विजयची लव्हस्टोरी

‘जवळपास ५५ दिवसांनंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मला खूप आनंद होत आहे. सर्वांचे आभार.. आता मी स्वत: श्वास घेत आहे’ असे अनिरुद्धने ट्वीटमध्ये म्हटले आहे. अनिरुद्ध आता बरा झाल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्ते केला आहे.

भोपाळमध्ये एका वेब सीरिजचे चित्रीकरण सुरु असताना अनिरुद्धला करोनाचा संसर्ग झाला. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. पण अनिरुद्धची तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता अनिरुद्धने करोनावर मात केली असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anirudh dave returns home from hospital after 55 days fight with covid avb