छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. अंकिता  सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. अंकिता सतत वादग्रस्त कमेंट,फोटो पोस्ट करते ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.

काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडेला तिच्या आगामी मालिका ‘पवित्र रिश्ता २.०’साठी ट्रोल करण्यात आले होते. तिच्या या मालिकेला बॅन करण्याची मागणी देखील काही नेटकऱ्यांनी केली होती. पवित्र रिश्ता नंतर आता पुन्हा एकदा अंकिता ट्रोल झाली आहे. अंकिता सोशल मीडियावर बरेच फोटो पोस्ट करत असते. अंकिताने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये परिधान केलेल्या कपड्यांवरून काही नेटकरी तिला ट्रोल करताना दिसले.

अंकिता या फोटोमध्ये गुलाबी रंगाचं टी-शर्ट घालून केस मोकळे ठेवले आहेत. त्या ड्रेसला साजेल असे शूज देखील घातल्याचे दिसत आहेत.अंकिताने शेअर केलेल्या फोटो खाली तिने मी खूप तयार झाले आहे का ? असा प्रश्न देखील विचारला. अंकिता या फोटो मधे खुप गोड दिसते आहे. तिचा हा पेहेराव मात्र काही नेटकऱ्यांना पटलेला दिसत नाही.

अंकिताने शेअर केलेल्या या फोटोवर काही चाहत्यांनी हॉट, खूप सुंदर अशी कमेंट केलेली दिसते. तर दुसरी कडे ‘तुला कापड कमी तर नाही पडलं ?’ असा प्रश्न विचारला आहे . अंकिताच्या फोटोवर कमेंट करत एक युजर म्हणाला ‘पॅन्ट कुठे आहे ?’ दुसरा युजर म्हणतो ‘मॅडम,हा ड्रेस विचित्र आहे’.

ankita-lokhande-photo-went-viral

या आधी देखील अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमूळे तिला ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान अंकिता लोखंडे आणि शाहीर शेख पवित्र रिशता मध्ये प्रमुख भूमिका सकरतान दिसणार आहेत. काही दिसवसंपूर्वीच अल्ट बालाजीने या मालिकेचा पहिला लुक शेअर केला होता.