scorecardresearch

‘पार्ट्या आणि पैसा…’ अंकितानं सांगितलं विकी जैनशी लग्न करण्याचं धक्कादायक कारण

अंकिता लोखंडेनं काही दिवसांपूर्वीच बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं आहे.

ankita lokhande, vicky jain, ankita lokhande marriage, ankita lokhande husband, अंकिता लोखंडे, विकी जैन, अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम, अंकिता लोखंडे पती, अंकिता लोखंडे लग्न
अलिकडेच एका मुलाखतीत अंकिता लोखंडेला, 'विकी जैनशी लग्न का केलं?' असा प्रश्न विचारला होता.

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेनं अलिकडेच बिझनेसमन विकी जैनशी लग्नगाठ बांधली. या दोघांनी मुंबईच्या अलिशान हॉटेलमध्ये शाही अंदाजात लग्न केलं. अंकिता आणि विकीनं या लग्नासाठी बराच पैसा खर्च केला हे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंवरून दिसून आलं. दोघंही २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते. पण अलिकडेच एका मुलाखतीत अंकिता लोखंडेला, ‘विकी जैनशी लग्न का केलं?’ असा प्रश्न विचारला तेव्हा मात्र तिने दिलेलं उत्तर खूपच धक्कादायक होतं.

लग्नानंतर ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, ‘मी विकी जैनशी लग्न केलं कारण, मी पार्ट्या करू शकेन, तुम्हाला माहितच असेल की लग्नानंतर आम्ही तीन दिवस पार्टी केली होती. आम्हाला फक्त पैसा खर्च करायचा आहे.’ याच मुलाखतीत अंकितानं लग्नानंतर ३ दिवस चाललेल्या त्यांच्या पार्टीचा खुलासा केला.

लग्नानंतर विकी जैननं पत्नी अंकिता लोखंडेला मालदीवमध्ये एक अलिशान व्हिला भेट म्हणून दिला आहे. ज्याची किंमत ५० कोटींपेक्षाही जास्त असल्याचं बोललं जातं. एवढंच नाही तर विकी आणि अंकिता यांनी अलिकडेच त्यांचं नवीन घरही विकत घेतलं आहे. याशिवाय त्यांनी एक खासगी यॉट खरेदी केली आहे ज्याची किंमत ८ कोटी रुपये एवढी आहे.

अंकिता लोखंडे तिच्या लग्नाबाबत नेहमीच उत्साहीत होती. तिनं लग्नाआधीच्या अनेक मुलाखतींमध्ये ग्रँड वेडिंग प्लान सांगितला होता. जेव्हा अंकिता आणि विकी यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्या बॉलिवूड सेलिब्रेटींनीही हजेरी लावली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ankita lokhande reaction on why she married to vicky jain mrj

ताज्या बातम्या