scorecardresearch

“सुशांतच्या निधनानंतर…”, अंकिता लोखंडेनं केला धक्कादायक खुलासा

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली होती.

ankita lokhande, vicky jain, sushant singh rajput, sushant singh rajput death, ankita lokhande relationship, ankita lokhande husband, अंकिता लोखंडे, सुशांतसिंह राजपूत, विकी जैन, अंकिता लोखंडे इन्स्टाग्राम, सुशांतसिंह राजपूत निधन
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हे जवळपास ६ वर्षं रिलेशनशिपमध्ये होते.

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत हे जवळपास ६ वर्षं रिलेशनशिपमध्ये होते. ‘पवित्र- रिश्ता’ या मालिकेतून दोघांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यावेळीच त्याच्या नात्यात जवळीक निर्माण झाली. अंकिता आणि सुशांतच्या जोडीला चाहत्यांची मोठी पसंती मिळायची. मात्र २०१६ मध्ये अंकिता आणि सुशांतचं ब्रेकअप झालं. मात्र सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. अलिकडेच अंकितानं बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं.

नुकतंच ‘स्मार्ट जोडी’ या शोमध्ये अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांनी सुशांतच्या निधनाचा त्यांच्या नात्यावर कसा परिणाम झाला यावर भाष्य केलं. याबाबत बोलताना अंकिता म्हणाली, ‘त्यावेळी मी विकीला एक दिवस का बोलवलं होतं मला आठवत नाही. पण मला त्याची त्यावेळी खूप गरज होती. ती आमच्या नात्याची सुरुवात होती. त्यानंतर आम्ही ३ वर्षं एकमेकांना डेट केलं.’

आणखी वाचा- ‘गंगूबाई काठियावाडी’ पाहिल्यावर रणबीरनं टाळलं प्रतिक्रिया देणं, गर्लफ्रेंड आलिया म्हणते…

अंकिता आणि विकीनं सुशांतचं निधन हे त्यांच्या नात्यातील सर्वात कठीण काळ होता आणि त्यातून ते कसे बाहेर पडले हे यावेळी सांगितलं. अंकिता म्हणाली, ‘आज आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतोय. आमच्या आयुष्यात बरेच चढ-उतार आले. तरीही आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो. प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्या पार्टनरच्या कठीण काळात त्याच्यासोबत खंबीरपणे उभं राहण्याची क्षमता नसते. मात्र विकी माझ्या कठीण काळात माझ्यासोबत होता. सुशांतच्या निधनानंतरचा काळ आमच्या नात्याची परिक्षा घेणारा ठरला.’

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ankita lokhande talk about her relationship with vicky jain after sushant singh rajput death mrj

ताज्या बातम्या