बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य करत असतात. आपले मत रोखठोकपणे मांडण्यासाठी अनुपम प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. काही दिवसांपूर्वी अनुपम यांनी कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. इमर्जन्सी चित्रपटामध्ये ते ‘जयप्रकाश नारायण’ यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

सुमारे ५०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनुपम यांनी नाटकांपासून करिअरची सुरुवात केली. त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर ते काही वर्ष काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. या काळात अनुपम स्थानिक स्तरांवरील नाटकांमध्ये काम करत असत. चंदीगढला असताना एका नाटकांच्या निमित्ताने त्यांची पत्नी किरण खेर यांच्याशी ओळख झाली. किरणसुद्धा त्या वेळी नाट्यक्षेत्रात सक्रिय होत्या. २६ ऑगस्ट १९७५ रोजी दोघांनी लग्न केले.

आणखी वाचा- अभिनेते अनुपम खेर यांनी बॉलिवूडसह आमिर खानलाही सुनावलं, म्हणाले, “आपण कलाकार विकत आहोत आणि…”

आज अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाचा ३७वा वाढदिवस आहे. या खास दिवसाचे औचित्य साधत अनुपम यांनी त्यांच्या लग्नातला एक खास फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. लग्नातल्या या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. सोनेरी रंगाची साडी नेसलेल्या किरण दोन्ही हातांनी विस्कटलेले केस सावरत आहेत. तर अनुपम हसत एका बाजूला पाहत आहेत. दोघांच्या गळ्यामध्ये वरमाला आहेत. ‘लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय किरण. अलिकडे शिमल्याला गेलेलो असताना माझ्या वडिलांनी जपून ठेवलेला ३७ वर्षांपूर्वीचा हा फोटो त्यांच्या ट्रंकमध्ये सापडला. ईश्वर तुला सुख, दिर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो.’ असे म्हणत त्यांनी किरण खेर यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा- Video : बॉयकॉट ट्रेंड सुरु असताना रणबीरच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुपम यांनी पोस्ट केलेला फोटो काही मिनिटांमध्ये व्हायरल झाला. या फोटोखाली त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनुपम आणि किरण यांच्या अनेक सहकलाकारांनी देखील त्यांच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत.