Anupam Kher reveals he and wife Kirron Kher live in separate rooms : अनुपम खेर हे बॉलीवूडचे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते केवळ त्यांच्या चित्रपटांमुळेच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहतात. सोशल मीडियावर अनेकदा सक्रिय राहणारे हे अभिनेते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात.

अनुपम खेर राजकीय, बिगरराजकीय, चित्रपट व सामाजिक विषयांवर त्यांचे विचार व्यक्त करण्यास कधीही मागे राहत नाहीत. ते त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांच्या कुटुंबाची झलक शेअर करीत राहतात.

अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला ४० वर्षे झाली आहेत. अनुपम खेर म्हणाले की, लग्नात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचा आदर, एकमेकांबद्दल कणव आणि मैत्री. अलीकडेच ते दोघेही ‘तन्वी द ग्रेट’च्या स्क्रीनिंगमध्ये एकत्र दिसले. अनुपम खेर आणि किरण खेर हे इंडस्ट्रीतील एक आदर्श जोडपे मानले जाते. त्यांच्या नात्याबद्दल बोलताना अनुपम खेर म्हणाले की, लग्नात एकमेकांचा आदर करणे आणि मित्र राहणे महत्त्वाचे आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या पत्नी किरण खेर यांच्याबद्दल काय म्हटले?

फिल्मफेअरला दिलेल्या एका खास मुलाखतीत अनुपम खेर यांनी त्यांच्या पत्नी किरण खेर यांच्याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, ते आणि किरण खेर वेगवेगळ्या खोलीमध्ये राहतात. त्यांनी सांगितले की, त्यांना किरण खेर खूप मजेदार वाटतात. त्यांनी किरण खेर यांच्याबद्दल सांगितले की, “ती कधी कधी खूप स्पष्ट बोलते; पण नंतर मला कळते की, ती बोलली ते अगदी बरोबर आहे. ती चित्रपट पाहते आणि सांगते की, किती वाईट काम झाले आहे.”

अनुपम खेर यांनी सांगितले, “त्या काळात ती माझा हात धरून चित्रपट प्रदर्शनाला जायची आणि जर माझा अभिनय वाईट असेल, तर ती हळूहळू तिचा हात काढून टाकायची; जणू तिचा माझ्याशी काही संबंधच नव्हता. ती म्हणायची, “तू काय करतोयस, तू मला बरबाद करीत आहेस. तू वेडा झाला आहेस.” अनुपम खेर म्हणाले की, सुदैवाने गेल्या १० ते १५ वर्षांत असे घडलेले नाही. कारण- मी काही चांगले काम केले आहे.

अनुपम खेर पुढे म्हणाले, “तिला भ्रम आहे. तिला वाटते की, गोष्टी चुकीच्या होतील. आता फारसे घडत नाही; पण सुरुवातीला असेच होते. आता आमच्याकडे वेगळ्या रूम आहेत. कारण- प्रत्येकाच्या स्वतःच्या सवयी आहेत. मी बाथरूममध्ये गेलो, तर तिला वाटते की, मी कमोडची लीड परत लावणार नाही. तिला वाटते की, मी बाथरुममधील लाईट बंद करणार नाही. मी बेडवरून उतरताच ती विचारते, तुम्ही लाईट बंद केली का? आणि मग मी म्हणतो की, किरणजी, मी अजून आत गेलोच नाही. तिचा पुढचा प्रश्न असतो, तुम्ही फ्लश केला का? पूर्वी त्याचा माझ्यावर खूप परिणाम व्हायचा; पण नंतर मी त्यावर हसायला लागलो. मला वाटले की, ती खूप मजेदार आहे.”

अनुपम खेर म्हणाले, “माझ्या लग्नात चढ-उतार आले आहेत. पण, आमच्याबरोबर जे राहिले आहे, ते म्हणजे करुणा, आदर, दयाळूपणा व मैत्री. या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.