बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ते बऱ्याचवेळा त्यांच्या आईचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यावेळी देखील त्यांनी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, यावेळी अनुपम यांनी असा प्रश्न विचारला की यांची आई संतापली आहे.

अनुपम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुपम यांची आई गिफ्ट म्हणून काही टी-शर्ट आणि शर्ट देतात. अनुपम यांना ते शर्ट आवडतात आणि ते बोलतात की हे सगळे माझ्यासाठी आहेत की मला यातून एक घ्यायचं आहे. यावर त्यांची आई बोलते, सगळे आवडले असतील तर सगळे घे, तुझ्यापेक्षा दुसर काय महत्त्वाच आहे. अनुपम जेव्हा त्यांच्या आईला शर्टच्या किंमती विषयी विचारतात. तेव्हा त्यांची आई बोलते, माझ्या लक्षात नाही, सगळे वेगवेगळे घेतले आहेत. अनुपम बोलतात पैसे दिले की नाही. हे ऐकताच त्यांची आई संतापते आणि बोलते, शर्ट देणारा तुझा बाप होता का? तो असाच देईल. पुढे त्या बोलतात की १० ते २० हजार लाख रुपये दे. त्यावर अनुपम बोलतात हजार की लाख रुपये..त्यांची आई बोलचे लाख रुपये, हजारांमध्ये काय होणार आहे.

आणखी वाचा : आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

आणखी वाचा : Bigg boss ott विजेती दिव्या अग्रवाल झाली तृतियपंथी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ शेअर करत, “आईने माझ्यासाठी काही शर्ट आणले. हे एक देण्याची आणि घेण्याची एक सोपी पद्धत असायला पाहिजे होती. पण दुलारीच्या बाबतीत ते शक्य नाही. तिला दुसऱ्या गोष्टींविषयी विचारलं की ती आमच्या संवादात गरज नसताना माझ्या बापाला घेऊन येते,” असे कॅप्शन अनुपम यांनी दिले आहे.