हिंदी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते पंजक त्रिपाठी यांचा आज वाढदिवस. अनेक वर्षांच्या स्ट्रगलनंतर ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांनी सुलतान कुरेशीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानेच वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या पंकज त्रिपाठी यांना स्टार बनवले आणि त्यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. पण पंजकना या चित्रपटात भूमिका देणे हे दिग्दर्शक अनुराग कश्यपला मान्य नव्हते. दिग्दर्शक अनुराग कश्यपला त्याच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटात पंकज त्रिपाठीना कास्ट करायचे नव्हते.

आणखी वाचा : प्रदर्शनाच्या आधीच ‘ब्रम्हास्त्र’ने कमावले ‘इतके’ कोटी, नवा विक्रम रचण्यासाठी चित्रपट सज्ज

मुकेश छाबरा यांना ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या कास्टिंगची जबाबदारी देण्यात आली होती. बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कास्टिंग दिग्दर्शकांपैकी एक असलेल्या मुकेश यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ” या चित्रपटासाठी त्यांनी 384 अभिनेत्यांच्या ऑडिशन घेतल्या होत्या. या संपूर्ण प्रक्रियेला एक वर्षाहून अधिक काळ लागला.” तसेच मुकेश छाबरा यांनी सांगितले की त्यांनीच अनुराग कश्यपला पंकज त्रिपाठीला चित्रपटात घेण्यास राजी केले होते.

पंजक त्रिपाठी यांना चित्रपटात भूमिका दिली तर ती ते उत्कृष्टप्रकारे निभावतील याची अनुराग कश्यपला खात्री वाटत नव्हती. ताई त्याने एक-दोन वेळा मुकेश यांना बोलूनही दाखवले होते. पंकज कोण आहेत हे अनुरागला माहीत नव्हते. पण पंकज त्रिपाठी आणि मुकेश छाबरा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकत्र शिकले होते. त्यामुळे पंकज एक उत्तम अभिनेते अभिनेता होता मुकेशना माहीत होतं. कारण त्यांनी पंकजना रंगमंचावर अभिनय करताना पाहिले होते. पण अनुरागला पंकजच्या जागी दुसरा अभिनेता हवा होता. त्याचे नाव मुकेश यांनी आजतगायत गुलदस्त्यात ठेवले आहे. शेवटी मुकेश यांनी त्या दोघांना ऑडिशनसाठी राजी केले.

पंकज त्रिपाठी त्यावेळी साऊथमध्ये शूटिंग करत होते. पण मुकेश यांनी त्यांना मुंबईला बोलावलं आणि संपूर्ण दिवस पंकज आणि इतर कलाकारांच्या ऑडिशनमध्ये घालवला. मग त्यांनी रेकॉर्डिंगसह त्यांचा लॅपटॉप अनुरागला दिला आणि खोलीतून बाहेर पडले. त्या रेकॉर्डिंग्समध्ये पंकज यांची ऑडिशन पाहून अनुराग भरवून गेला. पंकज हे एक उत्तम अभिनेते आहेत हे अनुरागला समजले आणि त्याने पंकजना ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटात त्यांना महत्वपूर्ण भूमिका देऊ केली आणि अशाप्रकारे त्यांचे नशीब बदलेले.

हेही वाचा : “गँग्ज ऑफ वासेपूरमधून कुणालाच आर्थिक फायदा झाला नाही” : अनुराग कश्यपचा धक्कादायक खुलासा

पंकज त्रिपाठी यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटात मनोज बाजपेयीसोबत काम केले होते. आज पंकज यांची गणना इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते.