scorecardresearch

अनुष्काच्या लंडनमधील त्या फोटोवर विराटची कमेंट, मजेशीर उत्तर देत अनुष्का म्हणाली…

अनुष्काचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

virat kohli, Virat, vamika s, Vamika, anushka sharma, Anushka, Anushka photos,
अनुष्काने विराटला दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा पती विराट कोहलीसोबत लंडनमध्ये फिरतानाचे फोटो शेअर करताना दिसते. तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर कमेंट आणि लाइकचा वर्षाव करतात. पण सध्या अनुष्काच्या फोटोवर विराटने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप परिधान केल्याचे दिसत आहे. त्यावर छान अशी ज्वेलरी अनुष्काने घातली आहे. या फोटोमध्ये अनुष्का अतिशय आनंदी दिसते. तिच्या फोटोवर विराटने कमेंट करत लक्ष वेधले आहे.

विराटने ‘तुझे हे फोटो कुणी काढले’ असे म्हणत कमेंट केली आहे. त्यावर अनुष्काने मजेशीर अंदाजात उत्तर दिले आहे. ‘माझ्या एका चांगल्या चाहत्याने’ असे म्हटले आहे. अनुष्काने विराटला दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

virat kohli, Virat, vamika s, Vamika, anushka sharma, Anushka, Anushka photos,

इंग्लंडमध्ये गेल्यापासून अनुष्का दररोज तिथले वेगवेगळे फोटोज शेअर करत फॅन्सना अपडेट देत असते. अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी नवे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती इंडियन क्रिकेट टीममधील खेळाडूंसोबत आणि सुनिल शेट्टीची मुलगी आथिया शेट्टीसोबत दिसून आली. यात अनुष्का आणि विराट व्यतिरिक्त केएल राहुल, आथिया शेट्टी, इशांत शर्मा, प्रतिमा सिंह, उमेश यादव आणि त्याची पत्नी तान्या वाधवा हे सर्वच जण दिसून आले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2021 at 13:45 IST
ताज्या बातम्या