बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनुष्का चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच अनुष्काने एक फोटो शेअर केला आहे. पण यावेळी अनुष्काने तिचा फोटो नाही तर जेवणाचा फोटो शेअर केला आहे.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून हा फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोत मराठमोळे पदार्थ दिसत आहेत. अनुष्का केळीच्या पानावर पारंपारिक पद्धतीने दिल्या जाणार्‍या महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद घेत आहे. अनुष्काच्या ताटात वरण भात, मसाला भात, हिरव्या वाटाण्यासारखी आणखी एक भाजी, लोणच आणि अळू वडी दिसतं आहे. हा फोटो शेअर करत अनुष्काने ‘जेवणाची वेळ झाली’ असं म्हटलं आहे.

आणखी वाचा : “हरिश दुधाडेच पाहिजे होता…”, ‘शेर शिवराज’ चित्रपटातील बहिर्जीं नाईकांच्या भूमिकेवरून नेटकरी नाराज

आणखी वाचा : राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांचा मुलगा ‘या’ चित्रपटातून करणार सिनेसृष्टीत पदार्पण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनुष्काने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओत अनुष्का त्यांच्या बागेत असलेल्या ताज्या टोमॅटोचा जाम बनवताना दिसली होती. अनुष्काला वेगवेगळे पदार्थ खाण्याची आवडं आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पदार्थांचे फोटो शेअर करताना दिसते.