‘बाहुबली २ द कन्क्लुजन’ Baahubali चित्रपटातील प्रभास Prabhas आणि अनुष्का शेट्टीची केमिस्ट्री आणि पडद्यामागे त्यांच्यात असलेली मैत्री पाहता या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. कटप्पाने बाहुबलीला का मारले? यानंतर प्रभास आणि अनुष्का एकमेकांना डेट करत आहेत की नाही ? हाच प्रश्न सध्या सर्वाधिक विचारला जात आहे. या प्रश्नाला अनुष्काने Anushka Shetty लगाम लावला असून, त्यांच्यासंबधीच्या अफवांमुळे ती निराश झाली आहे. अनुष्का आणि प्रभास लग्न करणार असल्याच्या अफवा सध्या सर्वत्र पसरत असून, यामागे त्यांच्या टीममधील एका व्यक्तीचा हात असल्याचे अनुष्काने म्हटले आहे.

वाचा : मासिक पाळीविषयी अक्षय म्हणतो….

मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व अफवांमागे हात असणाऱ्या व्यक्तीचा अनुष्काने चांगलाच समाचार घेतल्याचे समजते. याआधी लग्नाच्या अफवांबद्दल अनुष्का म्हणालेली की, मी ज्या अभिनेत्यांसोबत काम करते त्यांच्याशी माझं नाव जोडण्याची प्रसारमाध्यमांना सवयच झाली आहे. यामुळे अनुष्काची नाराजी स्पष्ट दिसून येते. अनुष्का आणि प्रभासची खऱ्या आयुष्यातही जोडी जमावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र, या बातमीनंतर नक्कीच त्यांची निराशा होईल यात शंका नाही.

वाचा : .. आता रामूचीही टिवटिव बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आगामी ‘साहो’ चित्रपटामध्ये प्रभासची वर्णी लागल्याचे सर्वांनाच माहित आहे. पण, त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री झळकणार याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. दरम्यान, ‘साहो’मध्ये प्रभाससोबत अनुष्का दिसणार असल्याचीही चर्चा रंगलेली. प्रभासच्या हिरोईनसाठी श्रद्धा कपूर, दिशा पटानी यांसारख्या अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नाव समोर आली होती. मात्र, या अभिनेत्रींचे मानधनाचे आकडे पाहता निर्मात्यांनी त्या सर्व अभिनेत्रींना नाकारले आहे. त्यामुळे ‘साहो’मध्ये अनुष्काची वर्णी लागण्याची दाट शक्यता असल्याचे दिसते.