बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर लहानपणापासूनच त्याच्या बॉडी इमेजमुळे अनेक गोष्टींचा सामना करत आला आहे. त्याच्या वजनामुळे अर्जुन कपूरला अनेक वेळा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत, अर्जुन कपूर आपलं फॅट टू फिट जर्नी आणि इतर संबंधित गोष्टी तसंच ट्रोलर्सना देखील योग्य उत्तर देण्यापासून कधीही मागे हटत नाही. नुकतंच एका कार्यक्रमात त्याने बॉडी पॉझिटिव्हिटीवर मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी अर्जुन कपूरने त्याच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांविषयी माहिती दिली. त्याची आई मोना शौरीचा मृत्यू कधी झाला आणि त्याने या परिस्थितीचा सामना कसा केला इथपासून ते त्याच्या आई-वडिलांच्या घटस्फोटापर्यंतच्या सर्व गोष्टी त्याने शेअर केल्या.
नुकतंच बहीण रिया कपूरच्या लग्नाच्या कार्यक्रमात दिसलेल्या अर्जुन कपूरने त्याच्या कारकिर्दीबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. आईच्या मृत्यूनंतर त्याने बॅक-टू-बॅक चित्रपट बनवण्यास सुरुवात केली याबद्दल सुद्धा त्याने काही सिक्रेट्स शेअर केले. अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्याने अवघ्या १० वर्षात १६ चित्रपट कसे करू शकला, यामागची सत्य कहाणी प्रेक्षकांसमोर मांडली.
View this post on Instagram
तो म्हणाला, “मी माझ्या आईला गमावल्याच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी लागोपाठ काम करत राहिलो आणि कुठेतरी याची मला मदत देखील झाली. गेल्या 9-10 वर्षांत मी 16 चित्रपट केले. मी खूप काम केलं. पण मी माझ्या स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. म्हणून, पुढे जाऊन मला बदलण्याची इच्छा झाली. मला वाटतं की सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मी स्वतःसाठी करिअर घडवू शकलो आणि स्वतंत्र झालो. मी एका चांगल्या कुटुंबातून आलो आहे, मला विशेषाधिकार आहेत. माझे स्वतःचे संघर्ष आणि प्रवास आहेत, ज्याची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही.”
View this post on Instagram
अर्जुन कपूरने मुलाखतीत बोलताना त्याच्या पालकांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर जास्त खाणं सुरू केलं यावर देखील त्याने काही गोष्टी शेअर केल्या. यावेळी बोलताना तो म्हणाला, “मला आठवतंय की मी माझ्या शरीराच्या आकारानुसार ठीक आहे. मी ठीक होतो, पण समाधानी नव्हतो. माझे आईवडील वेगळे झाले आणि मी खाण्यात स्वतःचं सांत्वन करून घेतलं. त्यामुळे माझं आयुष्य बदललं. दुःखतही मी आनंद शोधण्याचा प्रयत्न करू लागलो. लपवणे आणि खाणे हाच माझा मार्ग होता.”
अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर हे दोघेही बोनी कपूरची पहिली पत्नी मोना शौरीची मुले आहेत. मोनापासून घटस्फोट घेतल्यानंतर बोनीने श्रीदेवीसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुली आहेत, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशी या दोघींची नावं आहेत.