महाराष्ट्राच्या राजकारणाला आता वेगळेच वळण आल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून आपण पाहत आहोत. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये एक वेगळंच राजकीय नाटक पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शिवसैनिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता अभिनेता आरोह वेलणकरने या सगळ्या प्रकरणावर भाष्य केले आहे.

आणखी वाचा : Alia Bhatt Announce Pregnancy : आलिया भट्ट होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

आरोहने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या सगळ्या प्रकरणावर भाष्य केले आहे. ‘शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठं केलं असं वारंवार बोललं जात आहे. मग एकनाथ शिंदे यांनीही शिवसेनेसाठी खूप काही केले आहे, याची जाणीव शिवसेनेला असायला हवी. आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांनीही सेनेला भरभरून दिले आहे,’ असे आरोह यावेळी म्हणाला.

आणखी वाचा : घटस्फोटाच्या चर्चेत सिद्धार्थ जाधवने पत्नी तृप्तीसोबत शेअर केला फोटो

आणखी वाचा : ‘Love You’, अखेर सई ताम्हणकरने प्रेमाची दिली कबुली, दौलतरावांच्या ‘त्या’ पोस्टवर केली कमेंट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे यांची वाट पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत परंतु एकनाथ यांची बाजू अधिकच भक्कम होत चालली आहे. आता पर्यंत ४० हूंन अधिक आमदारांचा पाठिंबा त्यांच्याकडे आहे. तर आरोह हा अभिनयासोबतच सामाजिक कामातही सक्रिय असल्याचे दिसते.