Ashish Chanchalani Weight Loss : वाढत्या लठ्ठपणामुळे आजकाल प्रत्येक व्यक्तीला मोठी समस्या निर्माण झाली आहे. जास्त वजन वाढल्याने व्यक्तीचे व्यक्तिमत्वच बिघडते असे नाही तर तो अनेक आरोग्य समस्यांना बळी पडतो. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक योगा आणि ध्यानाचा अवलंब करत आहेत, जिममध्ये तासनतास घाम गाळत आहेत, तरीही अपेक्षित परिणाम मिळत नाही.
अलीकडेच, सहा महिन्यांत ४० किलो वजन कमी करणारा प्रसिद्ध युट्युबर आशीष चंचलानीने सोशल मीडियावर त्याचा वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला होता. आशीषने त्याचा आवडता पदार्थ गुलाब जाम न सोडता सहा महिन्यांत ४० किलो वजन कसे कमी केले ते सांगितले आहे.
कॉमिक व्हिडीओंसाठी प्रसिद्ध असलेला भारतीय युट्युबर आशीष चंचलानीने सहा महिन्यांत ४० किलो वजन कसे कमी केले याचा खुलासा केला आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला भेटल्यानंतर त्याच्यात हा बदल सुरू झाला, ज्याच्या शब्दांनी त्याला त्याचा फिटनेस प्रवास सुरू करण्यास प्रेरित केले. एकेकाळी १३० किलो वजन असलेल्या चंचलानीचे आज ८८ किलो वजन आहे. योग्य आहार आणि वर्कआउट प्लॅनला फॉलो केल्याने हे सर्व शक्य झाले आहे.
आशीषने इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये आरोग्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलणारा क्षण शेअर केला होता. शाहरुख खानबरोबरच्या संभाषणाची आठवण करून देत त्याने लिहिले, “मी त्यांच्याकडे जाताच, शाहरुख सरांनी माझे पोट धरले आणि म्हणाले, ‘आशीष, वजन कमी कर, तुला खूप छान वाटेल, मी गॅरंटी देतो. जा यार – आज जिमला जा. फक्त ते कर. तू खूप गोंडस आहेस आणि तंदुरुस्त होण्याची वेळ आली आहे. जर तुझे आयुष्य बदलले नाही, तर मी तुला सल्ला देणे थांबवेन.’ मी त्यांचे शब्द कधीही विसरणार नाही, त्यांनी मला ज्या पद्धतीने सल्ला दिला…”
असे केले वजन कमी
आशीष चंचलानीने कोणताही स्ट्रिक्ट किंवा खूप जास्त डाएट प्लॅन फॉलो केला नाही. उलट, त्याने योग्य बदल करण्यावर लक्ष केंद्रित केले. एचटीशी बोलताना तो म्हणाला होता, “सर्वात मोठी समस्या अन्नाची नाही किंवा गोड खाणे नाही तर ओव्हरइटिंग करणे आहे.” आशीषने कबूल केले की तो वर्षानुवर्षे त्याच्या वजनाशी झुंजत होता आणि कॅमेऱ्यासमोर ते लपवण्याचा प्रयत्न करत होता. मी स्वतःला सांगितले, जवळजवळ वचन दिले होते की मी माझे तीन-अंकी वजन कायमचे मागे सोडेन. मी २०२२ मध्ये सुरुवात केली आणि डिसेंबर २०२३ पूर्वी मला दुहेरी अंक गाठायचे होते.
आशीषने सांगितले की तो नाश्त्यामध्ये सहा उकडलेले अंडे किंवा स्प्राउट्ससह एक ऑम्लेट खातो. दुपारच्या जेवणामध्ये तो २०० ग्रॅम चिकन, १ चपाती, ओवा आणि काकडीचा ज्यूस पितो. संध्याकाळी तो ६ वाजता व्हे प्रोटीन शेक पितो. रात्रीचे जेवण तो सुमारे ८ वाजता करतो. त्यामध्ये तो फक्त प्रथिनेयुक्त चिकन खातो.
आशीषने निरोगी वजन कमी करण्यासाठी आहाराबरोबरच त्याच्या व्यायामाच्या दिनचर्येकडेही पूर्ण लक्ष दिले आहे. आशीषने सांगितले की, तो दर आठवड्याला गुलाब जाम आणि रस मलाई सारख्या त्याच्या आवडत्या मिठाई खात असे आणि अजूनही खातो. तो म्हणतो की वजन कमी करण्यासाठी काहीही पूर्णपणे सोडून देणे आवश्यक नाही, परंतु कॅलरीज मॅनेजमेंट महत्वाचे आहे. आशीष सध्या एली अवरामबरोबरच्या त्याच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.