scorecardresearch

Premium

आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिल्या पत्नीने दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “माझी फसवणूक…”

आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिल्या पत्नी राजोशी बरुआ यांनी दिली प्रतिक्रिया

ashish-vidyarthi-on-first-wife
आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नाबाबत पहिली पत्नी राजोशी बरुआ यांनी दिली प्रतिक्रिया (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या खासगी आयुष्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आशिष विद्यार्थी यांनी २५ मे रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी राजोशी बरुआ (पिलू विद्यार्थी) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. यामुळे नेटकऱ्यांनी आशिष विद्यार्थींनी पहिल्या पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली यावर आता राजोशी बरुआ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवरील नावात केला मोठा बदल…जाणून घ्या कारण

Mahmood Ali Slaps
पुष्पगुच्छ द्यायला उशीर, मंत्र्याने अंगरक्षकाच्या श्रीमुखात भडकावली, VIDEO पाहून लोकांचा संताप
ICC World Cup Ravi Shastri Takes Hit at Babar Azam With Biryani Kaisa Tha Video Babar Give no Nonsense Reply Before Match
बाबर आझमला रवी शास्त्रींनीं बिर्याणीवरून चिडवलं; सडेतोड उत्तराने नेटकरी लोटपोट, म्हणाला, “१०० वेळा ते..”
school
प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने शिक्षिकेकडून विचित्र शिक्षा, विद्यार्थी नैराश्येत गेल्यानंतर प्रकरण उजेडात!
gaur-gopal-das-piyush
गौर गोपाल दास यांना दीक्षा घेण्याआधी आवरता आला नाही ‘पीयूष’ प्यायचा मोह; जाणून घ्या ‘पीयूष’ या पेयाचा इतिहास

राजोशी बरुआ यांनी ‘हिंदुस्थान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आशिष विद्यार्थी यांनी त्यांची कधीही फसवणूक केली नाही, ते दोघेही दोन वर्षांपूर्वी वेगळे झाले आहेत. राजोशी म्हणाल्या, “आम्ही दोघे २०२१ मध्येच वेगळे झालो होतो आणि गेल्या वर्षी घटस्फोट झाला. आशिषला घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर कोणालाही सांगावे असे वाटले नाही. विभक्त झाल्यानंतरही आम्ही दोघे मित्र आहोत. आमच्या लग्नाची २२ वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ होता. आम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला, आमच्या अनेक आवडीनिवडी सारख्या होत्या, आमच्यात भांडण कधीच झाले नाही तसेच आम्हाला एक मुलगा सुद्धा आहे.”

हेही वाचा : आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं मराठी ऐकलंत का? ‘पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम पाहून नेटकरी म्हणतात “किरण मॅडम…”

राजोशी पुढे म्हणाल्या, “आम्हाला दोघांनाही आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या होत्या. यादरम्यान माझा कोणीही छळ केला नाही, गेल्या दोन वर्षांत आम्ही दोघेही आपल्या वाटेने जात आता चांगले आयुष्य जगत आहोत. सोशल मीडियावर केवळ अफवा सुरु असून आशिषने कधीही माझी फसवणूक केली नाही.”

दरम्यान, आशिष विद्यार्थी यांनीही दुसरे लग्न का केले याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, “आयुष्यात मी एकट्याने राहून पाहिले परंतु मला जोडीदाराबरोबर राहण्यास खूप आवडते. मागच्या वर्षी मी रुपाली बरुआ यांना भेटलो आणि आम्ही लग्न केले. रुपाली ५० वर्षांची असून मी ६० नाही तर ५७ वर्षांचा आहे. माझ्या आयुष्यात जे झाले ते कोणाच्याही आयुष्यात होऊ शकते म्हणून कायम दुसऱ्यांचा सन्मान करा आणि इतरांचा आदर करा.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ashish vidyarthi first wife rajoshi barua reacts on actors cheating rumors sva 00

First published on: 27-05-2023 at 10:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×