Avadhoot Gupte Buys New Car : आपल्या हक्काचं घर असावं, गाडी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. गेल्या काही काळात अनेक मराठी कलाकारांनी त्यांची ही स्वप्नं पूर्ण केल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता लोकप्रिय गायक अवधूत गुप्तनेही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

हटके स्टाईलने आणि उत्कृष्ट गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा गायक म्हणजे अवधूत गुप्ते. अवधूत मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक तर आहेच, पण यासह तो एक म्युझिक कंपोझर, निर्माता आणि दिग्दर्शकही आहे. अवधूत सोशल मीडियावरही सक्रिय असतो व अनेकदा त्यामार्फत त्याच्या कामासंदर्भातील नवीन अपडेट तसेच खासगी जीवनातील गोष्टींविषयी तो प्रेक्षकांना सांगत असतो. अशातच आता त्याने नुकतीच नवीन गाडी खरेदी केल्याची बातमी त्याच्या चाहत्यांसह शेअर केली आहे.

अवधूतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्याने नुकतीच एम. जी. सायबर्सटर MG Cyberstar ही आलिशान गाडी खरेदी केली आहे. Financial Expressच्या वृत्तानुसार अवधूतने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत जवळपास ७४.९९ लाख इतकी आहे. सोशल मीडियावर एम.जी. सायबरस्टार या कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर अवधूतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून यावेळी व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर त्याची पत्नी गिरिजा गुप्ते व मुलगा अभेद्य गुप्ते ही गाडी खरेदी करताना दिसत आहेत.

Avadhoot Gupte buys new luxury car shared video on social media
अवधूत गुप्तेच्या नवीन गाडीचा फोटो (फोटो : इन्स्टाग्राम)

अवधूतप्रमाणे त्याचा मुलगा अभेद्य गुप्तेलाही गायनाची व म्युझिकची आवड असल्याचं त्याच्या सोशल मीडिया पेजवरून कळतं. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे गायनाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याने त्याच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एक तारा’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली. यामध्ये त्याने अभिनेता संतोष जुवेकरच्या लहानपणाची भूमिका साकारलेली.

दरम्यान, अवधूतबद्दल बोलायचं झालं तर अवधूत मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे. तो नेहमी प्रेक्षकांसाठी वेगवेगळी गाणी घेऊन येत असतो. त्याने गायलेल्या गाण्यांना आजवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘आरपार’, ‘बेटर हाफची लव्हस्टोरी’ या चित्रपटांसाठी त्याने गाणी गायली आहेत.