बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने आजवर हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कधी रोमॅण्टिक तर कधी विनोदी भूमिकांमधून आयुष्मानने चाहत्यांची पसंती मिळवलीय. मात्र आता आयुष्मान एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मानच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा झालीय. हा सिनेमा रोमॅण्टिक किंवा विनोदी नसून हा पूर्णपणे अ‍ॅक्शन सिनेमा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलिज करण्यात आला आहे. या सिनेमाचं नाव ‘अ‍ॅक्शन हीरो’ असं असून आयुष्मान या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आयुष्मानाने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचा टीझर शेअर केलाय. या टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “अडचण फक्त एकच आहे की मला भांडण्याचा अभिनय करता येतो…भांडता येत नाही…काही तरी वेगळं करण्यासाठी खूप उत्साही आहे.” अशा आशयाचं कॅप्शन त्याने दिलंय. आयुष्मानच्या टीझरला त्याच्या चाहत्यांनी पसंती दिलीय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayushman khurana upcoming film action hero teaser release kpw
First published on: 09-10-2021 at 16:45 IST