अनेक सेलिब्रिटी हे त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळे देखील चांगलेच चर्चेत असतात. करिअरमधील संघर्ष असो किंवा जोडीदारांसोबतचे वाद काही सेलिब्रिटी विविध कारणांमुळे चर्चेत येत असतात. लोकप्रिय बंगाली अभिनेत्री श्राबंती चॅटर्जी देखील तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आलीय. श्राबंती तिच्या पतीपासून विभक्त होणार असल्याचं वृत्त समोर आलंय.

श्राबंती पहिल्यांदा घटस्फोट घेत नसून या आधी तिने दोन वेळा घटस्फोट घेतला आहे. त्यानंतर आता ती तिसरा पती रोशन सिंह यांच्यापासूव विभक्त होणार आहे. यासाठी तिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दिलाय. २००३ सालामध्ये श्राबंतीने फिल्म मेकर राजीव कुमार यांच्याशी पहिला विवाह केला होता. २०१६ मध्ये ती राजीव यांच्यापासून विभक्त झाली आणि तिने मॉडल कृष्ण व्रजशी लग्न केलं. मात्र हे लग्न फक्त एक वर्ष टिकलं. तर २०१९ सालामध्ये श्राबंतीने रोशल सिंह यांच्याशी विवाह केला होता. हे तिचं तिसरं लग्न होतं.

“ही काय महाराणी आहे का?”; एअरपोर्टवरील ‘त्या’ एका चुकीमुळे कंगना रणौत ट्रोल

देसी गर्लचा देसी अंदाज व्हायरल; प्रायव्हेट जेटमध्ये चक्क मांडी घालून बसली प्रियांका चोप्रा

एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत श्राबंतीचे पती रोशन सिंग यांनी श्राबंती मित्रपरिवारात त्यांची बदनामी करत असल्याता दावा केलाय. रोशन खूप जाड असल्याचं ती इतर लोकांमध्ये सांगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. रोशन सिंह जाड असल्याने तिच्यासोबत सेक्स करत नाहीत आणि म्हणून त्यांच्यापासून विभक्त व्हायचंय असं श्राबंती मित्रांना सांगून बदनामी करत असल्याचा खुलासा रोशन सिंह यांनी केलाय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय श्राबंतीवर तिचे पती रोशन सिंह यांनी अनेक आरोप केले आहेत. एक्स गर्लफ्रेण्डला कॉल करून ती अनेक तक्रारी करत असल्याचं त्यांनी म्हंटलंय.