हॉलीवूडमधून एक दुःखद बातमी आली आहे. ‘बेवॉच’ आणि ‘नाइट रायडर’मधील आपल्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी लोकप्रिय हॉलीवूड अभिनेत्री पामेला बाक हिचे निधन झाले आहे. ६२ वर्षांच्या पामेलाने आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येच्या बातमीने खळबळ उडाली आहे. तिच्या कुटुंबियांना व चाहत्यांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे.

लॉस एंजेलिसमधील मेडिकल एक्झामिनर कार्यालयाच्या प्रतिनिधीने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, पामेला तिच्या हॉलीवूड हिल्स येथील घरात ५ मार्च रोजी मृतावस्थेत आढळली.

पामेलाचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता डेव्हिड हॅसलहॉफने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. “पामेलाच्या निधनामुळे आमचे कुटुंब अत्यंत दु:खी आहे. या कठीण काळात प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. या कठीण काळात दुःखातून सावरत असताना आम्हाला प्रायव्हसी द्यावी, अशी मी विनंती करतो,” असं डेव्हिड हॅसलहॉफने म्हटलं आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

हेही वाचा – Video: अत्यंत शॉर्ट ड्रेस, पोज देताना तोल गेला अन् घसरून धापकन पडली; अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून नेटकरी ट्रोल करत म्हणाले…

पामेलाने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट नवीन वर्षाच्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२५ रोजी केली होती. तिने हा व्हिडीओ लंडनमधून शेअर केला होता. यात तिचा एक फोटो होता व तिच्या क्यूट नात देखील होतील. तिने हा व्हिडीओ शेअर करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

हेही वाचा – “ती मुलगी तिथे…”, चाहतीला किस करणाऱ्या उदित नारायण यांची कुमार सानूच्या एक्स गर्लफ्रेंडने घेतली बाजू; म्हणाली…

पाहा व्हिडीओ

दरम्यान, पामेलाच्या टीममधील शेरॉन केलीने टीएमझेडला सांगितलं की अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे तिला मोठा धक्का बसला आहे. “मला तिचे कुटुंबीय, तिच्या सुंदर मुली आणि नातवंडांना पाहून प्रचंड वाईट वाटतंय, कारण या सर्वांवर पामेलाचं खूप प्रेम होतं,” असं ती म्हणाली.

हेही वाचा – पाकिस्तानची ‘ऐश्वर्या राय’! २०० बिलियन डॉलर्सची कंपनी सोडली अन्…; भारतीय अभिनेत्रीशी तुलनेबाबत म्हणते…

पामेला बाकने ९० च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिने ‘चीयर्स’, ‘द फॉल गाय’, ‘टीजे’, ‘हूकर’, ‘सुपरबॉय’ आणि ‘वायपर’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पामेला व हॅसलहॉफ यांनी ‘द यंग अँड द रेस्टलेस’मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांनी १९८९ मध्ये लग्न केलं होतं आणि २००६ मध्ये घटस्फोट घेतला.