बॉलिवूडचा खिलाडी कुमारच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बेल बॉटम’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अक्षयने चित्रपटाचा ट्रेलर दिल्लीत संपूर्ण टीमसोबत लॉन्च केला आहे. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यांच लक्ष हे अभिनेत्री लारा दत्ताने वेधल आहे. लारा दत्ताने ‘बेल बॉटम’ या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. तिची ऑनस्क्रीन ट्रान्सफॉर्मेशन पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटातील फक्त अक्षयच्या भूमिकेची नाही तर लारा दत्ताच्या भूमिकेचीही स्तुती करण्यात आली आहे. लाराला या ट्रेलरमध्ये ओळखता देखील येत नाही आहे की ती एक ४६ वर्षांची स्त्री आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर लारादत्ता हे हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.

लाराच्या लूकची चर्चा सर्वत्र होत असल्याचे दिसत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘आपली मिस युनिव्हर्स लारा दत्ताचा हा लूक अप्रतिम आहे..या चित्रपटाची वाट पाहत आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘बापरे ही लारा दत्ता आहे…तिचा मेकअप पाहून ओळखता येत नाही आहे. मेकअप करणाऱ्याला पुरस्कार मिळाला पाहिजे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ही लारा दत्ता आहे…ओळखूच शकलो नाही, अप्रतिम.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘जेव्हा आपण आपल्या आवडत्या मुलीला खूप वर्षांनंतर भेटतो,’ अशा अनेक कमेंट करत कोणी लाराची स्तुती केली तर कोणी लारावर मीम्स शेअर केले आहेत.

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

आणखी वाचा : ‘मी वाट पाहू शकत नाही’, अर्जुनने केला मलायकाचा व्हिडीओ शेअर

आणखी वाचा : सोनाली कुलकर्णीने शेअर केला बिकिनी लूक, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बेल बॉटम’ चित्रपटात अक्षय कुमार हा एका रॉ एजेंटची भूमिका साकारताना दिसतं आहे. तर अभिनेत्री वाणी कपूर त्याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसत आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त हुमा कुरेशी देखील या चित्रपटात दिसणार आहे. बेल बॉटम हा चित्रपट सत्य कहाणीवर आधारीत आहे. हा चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.