प्रसिद्ध भोजपुरी गायिका निशा उपाध्याय हिला लाइव्ह इव्हेंट दरम्यान झालेल्या गोळीबारात गोळी लागली आहे. बिहारमधील सारण येथे इव्हेंटमध्ये गाणं गात असतानाच निशाला गोळी लागली आहे. गोळी लागल्यानंतर निशाला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी(३० मे) लाइव्ह इव्हेंट दरम्यान काही लोकांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात गाणं गात असलेल्या निशाच्या डाव्या पायाला गोळी लागली आहे. या घटनेत निशाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या तिच्यावर पटना येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
बिहारमधील या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु, या घटनेबाबत कोणतीही तक्रार अद्याप करण्यात आलेली नाही. गोळीबार कशाप्रकारे करणयात आला आणि तो कोणी केला? याबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, बिहारमधील सारण या गावात एका सांस्कृतिक कार्यक्रमात निशा गाणं गाण्यासाठी गेलेली असताना ही घटना घडली. निशा ही भोजपुरीमधील प्रसिद्ध गायिका असून ती लोकगीतांसाठी ती ओळखली जाते.
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhojpuri singer nisha upadhyay suffered bullet injury during live performance at bihar kak