भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येसाठी तिच्या आईने भोजपुरी गायक समर सिंहला जबाबदार धरलं आहे. समर आणि त्याच्या भावाने अभिनेत्रीची हत्या केल्याचा दावा अभिनेत्रीची आई मधू यांनी केला आहे. अशातच तिचे आजोबा आणि मावशीनेही याप्रकरणात मोठा दावा केला आहे. समर सिंहने आकांक्षाचे पाच कोटी रुपये घेतले होते आणि तो ती रक्कम परत करत नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“समर सिंह आणि त्याच्या भावाने हत्या केली” २५व्या वर्षी आत्महत्या केलेल्या आकांक्षा दुबेच्या आईचे गायकावर गंभीर आरोप, म्हणाल्या “त्याने २१ मार्चला…”

आकांक्षाची आई मधु यांना सांगितलं की त्यांची मुलगी खूप धाडसी होती. ती आत्महत्या करू शकत नाही. त्यांनी पोलीस-प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. सोमवारी सकाळी आकांक्षा दुबेची आई आणि भाऊ पोलीस ठाणे गाठले. वडील छोटे लाल दुबे अजूनही ट्रेनमध्ये आहेत. शनिवारी संध्याकाळी सात वाजता त्यांचं आकांक्षाशी मोबाईलवर बोलणे झाले. तेव्हा ती खूश होती. कोणत्याही समस्येबद्दल तिने सांगितलं नाही. रात्री १२ वाजता फोन केला असता तिने फोन उचलला नाही. कोणत्याही पार्टीत जाण्याबाबत सांगितलं नव्हतं. २१ मार्च रोजी आकांक्षा बस्तीमध्ये शूटिंग करत होती. त्यानंतर भोजपुरी गायक समरचा भाऊ संजय सिंहच्या भावाचा मोबाईलवर कॉल आला. तुला मारून टाकीन, अशी धमकी तो फोनवर तिला देत होता. आकांक्षाची असिस्टंट रेखानेही सांगितले की मॅडम सेटवर रडत होत्या, असंही तिच्या आईने सांगितलं.

आकांक्षा दुबेला हॉटेलात सोडणारा ‘तो’ तरुण पोलिसांच्या ताब्यात; आत्महत्येच्या रात्री दोघांची भेट कशी झाली? खुलासा करत म्हणाला…

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून समर आकांक्षाचा छळ करत होता. तिने पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी देत होता, तसेच तिला टाळत होता, असा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना आकांक्षा दुबेचे मामा म्हणाले, “तिने आत्महत्या केली यावर विश्वास बसत नाही. कारण ती खूप धाडसी होती. घर आणि कुटुंब सांभाळणारी होती. तिने कमी वयात मुंबईत एक फ्लॅटही स्वतःच्या नावावर घेतला होता, तिने गाडीही घेतली होती. तिच्यावर इंडस्ट्रीतल्या लोकांचा राग होता, तिचं यश त्यांना पाहावत नव्हतं. जी टीम तिला घेऊन वाराणसीला आली होती ती कुठे आहे? तो दिग्दर्शक कुठे आहे? त्या सर्व लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करायला हवी,” अशी मागणी तिच्या मामाने केली.

आत्महत्येपूर्वी पार्टीतून आकांक्षाबरोबर आलेला ‘तो’ तरुण कोण? तिला सोडायला रूममध्ये गेला अन्…; हॉटेल मॅनेजरचा मोठा दावा

ज्या भोजपुरी गायक समर सिंहवर आरोप झाले आहेत, तो रविवारपासून बेपत्ता आहे. एसीपी सारनाथ ज्ञानप्रकाश राय यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींना अटक केली जाईल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhojpuri singer samar singh took 5 crore from akanksha dubey claims actress mother hrc
First published on: 27-03-2023 at 14:48 IST