सलमान खानसोबत ‘तेरे नाम’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री भूमिका चावला तुम्हाला आठवते का? तेरे नामनंतर सिलसिले, दिल ने जिसे अपना कहा, रन, दिल जो भी कहे या चित्रपटांतून झळकलेली भूमिका आता बॉलीवूडमध्ये पुनर्पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. नुकतीचं याबाबतची माहिती भूमिकाने आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिली.
भूमिका म्हणाली का, ज्या पद्धतीने चित्रपटातील माझी भूमिका लिहली गेली आहे त्याबद्दल मी खूप खूश आहे. चित्रपटातील माझी भूमिका सशक्त असून त्याचे बरेच पैलू यात आहेत. यापूर्वी मी माझ्या कारकिर्दीत अशी भूमिका साकारलेली नाही. ‘लव्ह यू आलिया’ चित्रपटासाठी मी खूप उत्सुक आहे आणि लोकांनाही हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे. या चित्रपटातून समाजाला चांगला संदेश मिळेल.
‘लव्ह यू आलिया’ या चित्रपटात भूमिकाव्यतिरीक्त रविचंद्रन, सनी लिओनी, चंदन कुमार, संगीता चौहान आणि सयाजी शिंदे यांच्याही भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st May 2016 रोजी प्रकाशित
‘तेरे नाम’मधील ही अभिनेत्री आठवतेयं का?
नुकतीचं याबाबतची माहिती भूमिकाने आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिली.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 21-05-2016 at 18:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhumika chawla excited about luv u alia