बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. वेळोवेळी पोस्ट शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. असं असलं तरी अनेकदा चुकीची माहिती आणि आकडेवारी शेअर केल्याने बिग बींना अनेकदा ट्रोल करण्यात आलंय. बिग बींनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमुळे ते चांगलेच चर्चेत आले असून या ट्वीटमुळे अमिताभ बच्चन यांना ट्रोल करण्यात आलंय.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं होतं. एका अ‍ॅनिमेटेड व्हिडीओच्या माध्यमातून त्यांमी नीजचं कौतुक केलं होतं. हा व्हिडीओ बिग बींनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामला शेअर केलाय. मात्र व्हिडीओ शेअर करत असताना दिलेल्या कॅप्शनमध्ये बिग बींनी एक मोठी चूक केली आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केलीय.

हे देखील वाचा: “हे पण काढून टाक, कपडे नाही का?”, बॅकलेस टॉपवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर

हा व्हिडीओ शेअर करत बिग बींनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “त्याच्या दमदार खेळाने १०३ कोटी लोकांची छाती गर्वाने फुगलीय. भारतीय ऑलिम्पिक टीमने जगभरात देशाचा झेंडा फडकवत देशाची मान उंचावलीय.” अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. या ट्वीटमध्ये अमिताभ बच्चन यांनी देशाची लोकसंख्या चुकीची लिहिल्याने त्यांना ट्रोल केलं जातंय. सध्या भारताची लोकसंख्या १३० कोटींहून अधिक असताना बिंग बींनी लोकसंख्या लिहिताना चूक केल्याने नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

एक युजर म्हणाला,”१०३ करोड. हे ज्ञान कोणत्या यूनिवर्सिटीमधून मिळवलंय. आंधळ्या भक्तीमध्ये २७ कोटी जनतेला नायजेरियाला पाठवलंत का काका?”

तर आणखी एक युजर म्हणाला, “सरांना माहितेय भारतीय केवळ १०३ करोडच आहेत.”

बिग बी अमिताभ बच्चन लवकरच ‘चेहरे’, ‘झुंड’ आणि ‘मेडे’ या सिनेमात झळकणार आहे. तर सध्या बिग बी ‘गुडबाय’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.