‘बिग बॉस ओटीटी’चा फिनाले नुकताच पार पडला आहे. यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती म्हणजे ‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वाची. लवकरच ‘बिग बॉस’चं १५वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस १५ ‘हा शो देखील बॉलिवूडचा दंबख खान म्हणजेच सलमान खान होस्ट करणार आहे. हा शो होस्ट करण्यासाठी सलमान खान मोठी रक्कम घेत असल्याच्या कायम चर्चा असतात.

तर ‘बिग बॉस १५’साठी देखील सलमान खानने मोठी डील केल्याच्या चर्चा आहेत. ‘बिग बॉस १५’ शोचं १४ आठवडे सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान खानला ३५० कोटी एवढी मोठी रक्कम मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. ओटीटी ग्लोबल नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती शेअर करण्यात आली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर सलमान खानच्या मानधनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या आधी देखील सलमान खान ‘बिग बॉस’ शो होस्ट करण्यासाठी कोट्यावधी रुपये घेत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आजवर सलमानने या चर्चांवर शिक्कामोर्तब केलेलं नाही.

हे देखील वाचा: दिव्या अग्रवाल ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती; ट्रॉफीसह जिंकली ‘इतकी’ रक्कम?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बिग बॉस’ च्या १४व्या पर्वाच्या अखेरीस सलमानने निर्मात्यांकडे मानधन वाढवून मागितलं होतं. मानधन न वाढवल्यास पुढील पर्वाचं सूत्रसंचालन करण्यासंदर्भात विचार करावा लागेल असं सलमान म्हणाला होता. तर ‘बिग बॉस ओटीटी’साठी करण जोहरची होस्ट म्हणून निवड करण्यात आली होती. या शोमुळे करणला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. अनेकांनी सलमानसोबत करणची तुलना केली होती.
सलमान खान सध्या ‘टायगर ३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाशमी प्रमुख भूमिकेत आहेत.