मराठी ‘बिग बॉस’ या कार्यक्रमामुळे मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत घराघरांत पोहोचली. त्याचबरोबरीने ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेमध्ये शर्मिष्ठाने उत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. शर्मिष्ठा तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण तिचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. तेजस देसाईबरोबर शर्मिष्ठाने दोन वर्षांपूर्वी लग्न केलं. हे तिचं दुसरं लग्न. तिचं आपल्या नवऱ्यावर जिवापाड प्रेम आहे. म्हणूनच शर्मिष्ठाने तेजसला त्याच्या वाढदिवसापूर्वीच खास भेटवस्तू दिली आहे.
आणखी वाचा – राणादा-पाठकबाईंची लग्नापूर्वी लंडन ट्रिप, प्रेमात आकंठ बुडालेल्या सेलिब्रिटी कपलची चर्चा
गेले कित्येक महिने शर्मिष्ठाला कार खरेदी करायची होती. पण खर्चाचा ताळमेळ नव्हता आणि फारसं बजेट नसल्याने तिला ते शक्य झालं नाही. पण अखेरीस अधिकाधिक मेहनत करत शर्मिष्ठाने नवऱ्यासाठी महागडी कार खरेदी केली आहे. तेजससाठी आपल्या पत्नीने दिलेलं गिफ्ट म्हणजे मोठं सरप्राईज होतं. शर्मिष्ठाने या नव्या गाडीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
पाहा व्हिडीओ
शर्मिष्ठाने फोटो शेअर करत म्हटलं की, “माझे रसिक प्रेक्षक तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम असू दे. अजूनही यशाचं शिखर गाठायचं आहे. नविन कार खरेदी करायची हे ७ ते ८ महिन्यांपासून डोक्यात होतं. पण बजेट आणि नेहमीच्या खर्चाचं गणित अखेरीस जुळून आलं. म्हणूनच २९ जुलैला तेजसचा वाढदिवस असतो. तर त्यानिमित्ताने ही गाडी तेजसला मी गिफ्ट केली आहे.”
आणखी वाचा – Photos : “एका लग्नाच्या अनेक गोष्टी असं झालंय आता”; प्रशांत दामले यांनी शेअर केले कुटुंबाबरोबरचे सुंदर फोटो
शर्मिष्ठाने बरीच मेहनत करत निळ्य रंगाची महागडी कार खरेदी केली. खरं तर याचा तिला खूप आनंद आहे. तेजसला त्याच्या वाढदिवसापूर्वीच सुंदर गिफ्ट मिळालं आहे. शर्मिष्ठाने तेजसबरोबर काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. यामध्ये ती त्याला अगदी गुडघ्यावर बसून कारची चावी देताना दिसत आहे. नेटकऱ्यांसह अनेक सेलिब्रिटी मंडळींनी नव्या कारसाठी शर्मिष्ठा-तेजसचं अभिनंदन केलं आहे.