‘बिग बॉस मराठी ३’च्या घरामध्ये देखील नवरात्री उत्सवाचा उत्साह स्पर्धकांमध्ये पाहायला मिळला. सर्व स्परर्धकांनी नवरात्रीच्या रंगांनुसार त्या त्या रंगाचे कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दसऱ्याच्या निमित्ताने खास सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे. दसऱ्याच्या निमित्ताने दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. या भागात रहिवाशी संघातील सदस्यांना खास सरप्राईझ मिळणार आहे .

घरातील सदस्य सुंदर तयार झाले असून धम्माल मस्ती होणार आहे. कारणसुध्दा तसेच आहे “नवरात्री” आज दसराच्या दिवशी बिग बॉस सदस्यांचा हा दिवस खास बनवणार आहेत. वाद विवाद, भांडण, घरात पडलेले गट सगळं विसरून बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य एकत्र येऊन या सेलिब्रेशनचा भाग होणार आहेत. आईचा जोगवा मागेन या गाण्यावर महिला सदस्य अप्रतिम नृत्य देखील सादर  करणार आहेत. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाची राजगायिक अक्षया अय्यर आणि सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचा स्पर्धक विश्वजित बोरवणकर हे त्यांच्या सुरेल आवाजात एकसे बडकर एक गाणी सादर करणार आहेत.

अखेर दोन दशकांनंतर पाहायला मिळणार तारासिंह आणि सकिनाची प्रेमकथा, सनी देओलने केली ‘गदर २’ ची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर सर्व सदस्य मोठया उत्साहात डान्स आणि धमाल मस्ती करत या सणाचा आनंद लुटताना दिसणार आहेत. या खास भागात सर्व स्पर्धक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंडन करणार आहेत.