छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ‘बिग बॉस ओटीटी’ शोमधून उर्फीचा पत्ता कट झाला असला तरी या शोमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. मात्र उर्फी सध्या तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नुकतच उर्फीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी उर्फीने परिधान केलेले कपडे पाहून नेटकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
उर्फी जावेदला नुकतच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी उर्फीने डेनिम जीन्स आणि त्यावर एक क्रॉप डेनिम शर्ट परिधान केलं होतं. मात्र हे शर्ट इतकं तोकडं होतं की यातून उर्फीची ब्रा स्पष्ट दिसत होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून उर्फीच्या कपड्यांवरून तिला ट्रोल केलं जातंय.
View this post on Instagram
उर्फीच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “मॉर्डन भिकारी” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “अरे कुणाकडे जुने कपडे असतील तर या गरिबांना द्या.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “एकतर ब्रा दाखव किंवा जॅकेट, काय पाहावं यात लोकांचा गोंधळ उडतोय”

आणखी एक नेटकरी उर्फीच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, “बहिणी नवे कपडे घे. कपडे तोकडे झालेत. अंतर्वस्त्रही दिसू लागली आहेत.”
उर्फी जावेद ‘बिग बॉस ओटीटी’ या शोमधून एलिमिनेट होणारी पहिली स्पर्धक होती. एलिमिनेशननंतर या निर्णयावर उर्फीने नाराजी व्यक्त केली होती.