बिग बॉस १५ मध्ये देवोलिना भट्टाचार्जी आणि अभिजित बिचुकले यांच्यात सातत्यानं वाद सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिजितच्या बोलण्यानं मला असुरक्षित वाटतं असं म्हणणारी देवोलिना त्याच्याशी असलेली मैत्री मात्र अद्याप टिकवून आहे. त्यामुळे आता त्यांचे चाहतेही गोंधळले आहेत. अभिजितनं तर आपल्याला देवोलिना आवडत असल्याचं अनेकदा अप्रत्यक्षणे मान्य केलं आहे. तो अनेकदा तिच्याशी फ्लर्ट करताना दिसतो.

मागच्या आठवड्यात देवोलिनाबाबत बोलताना अभिजितनं अशा काही कमेंट केली होती की त्यामुळे देवोलिनाला वाईट वाटलं होतं. त्याने तिची तुलना वडापावशी केली होती. तो म्हणाला होता, ‘तू मला वडापावसोबतची तिखट मिरची वाटतेस… असं खाईन ना मी तुला…’ अभिजितनं देवोलिनावर अशी कमेंट केली तेव्हा तिथे प्रतिक सहजपाल देखील उपस्थित होता. अभिजितच्या बोलण्यानं देवोलिनाला अनकम्फर्टेबल वाटत असल्याचं त्यालाही जाणवलं आणि त्यानं तिला याबाबत आवज उठवण्याविषयी सुचवलं होतं.

त्यानंतर आता अभिजितनं देवोलिनाला असं काही म्हटलं आहे की, तो पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. त्याने देवोलिनाला वेस्टर्न ड्रेस परिधान करण्यास सांगितलं होतं. जेणेकरून ते शाहरुखचं रोमँटिक साँग रिक्रिएट करू शकतील. त्यावर देवोलिनानं, ‘बाहेर थंडी आहे तर मी वेस्टर्न कपडे घालणार नाही’ असं उत्तर दिलं होतं. पण यावर गप्प बसेल तो अभिजित कसला. तो देवोलिनाला म्हणाला, ‘मग इम्रान हाश्मीसारखं करायचं का?’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिजितनं काय करायचं हे स्पष्ट शब्दात सांगितलं नसलं तरी त्याचं दोन अर्थांनी बोलणं सर्वांच्या लक्षात आलं. इम्रान हाश्मी त्याच्या चित्रपटांपेक्षा किसिंग सीनसाठी जास्त ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी अभिजितनं देवोलिनाकडे किस मागितलं होतं आणि त्यानंतर आपल्या बोलण्यात इम्रान हाश्मीचा अशाप्रकारे उल्लेख करणं प्रेक्षकांनाही आवडलेलं नाही. अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अभिजितवर टीका झाली आहे. मात्र त्यानं अद्याप असं काही करणं थांबवलेलं नाही.