‘बिग बॉस १५’ मध्ये झळकणार हे दोन लोकप्रिय चेहरे

‘बिग बॉस १५’ साठी अनेक कलाकारांची नावं समोर येत आहेत.

bigg-boss15
(Photo-Instagram)

‘बिग बॉस ओटीटी’च्या धमाकेदार सिझन नंतर छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा १५ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बिग बॉसच्या घरात कोणते स्पर्धक दिसणार याची उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात आहेच. ‘बिग बॉस १५’ चे निर्मातेही पूर्ण मेहनत घेताना दिसत आहेत, जेणेकरून एकापेक्षा एक स्पर्धक बिग बॉसच्या घरात तुमचे मनोरंजन करतील. या शो साठी अनेक मोठमोठ्या कलाकारांना विचरण्यात आले आहे या यादीत अजून दोन लोकप्रिय कलाकारांची नावे समोर येत आहेत.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ फेम अभिनेत्री निधी भानुशालीला विचारण्यात आले आहे. निधी सध्या तिच्या अभिनया सोबत सोशल मीडियावरील पोस्टसाठी चांगलीच चर्चेत आहे. तसंच ‘कसोटी जिंदगी के’, ‘उडान’, सारख्या अनेक मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता रोनीत रॉयला देखील बिग बॉसच्या निर्मात्यांनी विचारले आहे. रोनीत रॉयने मालिकांसोबत अनेक सुपर हिट चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. या यादीत ‘सैनिक’, ‘हलचल’ या चित्रपटांचा समवेश आहे. याच बरोबर ‘होस्‍टेज’ या वेब सीरीजमधील त्याच्या दमदार अभिनयासाठी त्याचे कौतुक होतं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

रोनीत रॉय आणि निधी भानुसशाली बरोबरच अभिनेता करण कुंद्रा, अर्जुन बिजलानी आणि रीम शेख यांची नावं देखील चर्चेत आहेत. बिग बॉस स्पर्धकांची यादी कन्फर्म झाली नसल्याने प्रेक्षक आतुरतेने या बिग बॉस १५ च्या ग्रँड प्रीमिअरची वाट बघत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss 15 contestant alert this two popular face might be part of bigg boss house aad

ताज्या बातम्या