छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १५वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिझनच्या सुरुवातीपासूनच एकीकडे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये भांडणे सुरु आहेत तर दुसरीकडे काही स्पर्धकांमध्ये जवळीक निर्माण होत असल्याचे दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये स्पर्धकांनी चक्क कॅमेरासमोर किस केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील स्पर्धक ईशान सहगल आणि मायशा अय्यर यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचे दिसत होते. ते दोघेही सतत एकत्र दिसत होते. आता त्यांनी गार्डन एरियामध्ये किस केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
PHOTOS: आमच्या घरी असाच पडदा आहे; फोटोशूटमुळे ‘जय मल्हार’ फेम सुरभी हांडे झाली ट्रोल
बिग बॉस १५ हा शो सुरु होऊन जवळपास आठवडाच झाला आहे आणि प्रेक्षकांना एक रोमँटिंक जोडी पाहायला मिळत आहे. शोच्या पहिल्या दिवसापासूनच मायशा आणि ईशान यांच्यामध्ये चांगले बॉडिंग पाहायला मिळाले. आता त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे प्रतिक सहजपालचे घरातील इतर स्पर्धकांसोबत भांडण होत असल्याचे दिसत आहे.