छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो बिग बॉसच्या १५ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. टॉप चार स्पर्धकांमध्ये तेजस्वी प्रकार, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी पोहोचली होती. शमिताला पाठिंबा देण्यासाठी तिची बहिण अभिनेत्री शिल्पा शेट्टी सेटवर पोहोचली होती. त्यावेळी तिने फोटोग्राफर्सशी गप्पा मारल्या. दरम्यान एका फोटोग्राफरने तेजस्वी शमिताला आंटी म्हणाली असे शिल्पाला सांगतो. त्यावर शिल्पाने प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर शिल्पाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बिग बॉस १५च्या सेट बाहेरील असल्याचे म्हटले जात आहे. फोटोग्राफरने तेजस्वीच्या आंटी कमेंट विषयी सांगताच शिल्पाला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, ‘आता यावर मी काय बोलू. ती आंटी वाटते तरी का.. आंटी कोण आहे हे सर्वांना माहिती नाही अजून’ असे शिल्पा म्हणाली आहे.
आणखी वाचा : तेजस्वीने बिग बॉस १५ जिंकताच गौहर खान संतापली, ट्वीट करत म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल बिग बॉसच्या १५ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळा रंगला. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. बिग बॉसच्या या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वच स्पर्धकांनी नृत्याविष्कार करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. बिग बॉसच्या टॉप ६ मध्ये तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळाले. पण टॉप ६ मध्ये दाखल झाल्यानंतर रश्मी देसाई ही कमी मतांमुळे बाहेर झाली. तर निशांत भट्टने १० लाख रुपये घेत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर तेजस्वीने ‘बिग बॉस १५’च्या ट्रॉफिवर स्वत:चे नाव कोरले.