scorecardresearch

Video- …अन् रागाच्या भरात रश्मि देसाईनं लगावली देवोलिनाच्या कानशिलात

रश्मि देसाई आणि देवोलिनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

bigg boss 15, rashmi desai, devoleena bhattacharjee, rashmi desai slap devoleena bhattacharjee, rashmi desai video, rashmi desai instagram, रश्मि देसाई, देवोलिना भट्टाचार्जी, बिग बॉस १५, राखी सावंत
'तिकिट टू फिनाले' हा टास्क जिंकण्याच्या नादात रश्मि आणि देवोलिना यांना त्यांच्या मैत्रीचाही विसर पडलेला दिसत आहे.

बिग बॉस हा टीव्ही शो सर्वाधिक वादग्रस्त मानला जात असला तरीही या शोमध्ये अनेकदा मैत्री आणि प्रेम दोन्ही पाहायला मिळालं आहे. पण बिग बॉस १५ भांडण आणि वादासाठी ओळखलं जाईल असंच काहीसं चित्र सध्या बिग बॉसच्या घरात दिसत आहे. हा सीझन संपायला काही दिवसच उरले असताना घरातील सदस्यांमधील वाद आणि भांडणं वाढलेली दिसत आहेत. एवढंच नाही तर अगोदरच्या दोन सीझनमध्ये एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवोलिना भट्टाचार्जी आणि रश्मि देसाई यांच्यातही जोरदार भांडणं होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये तर रश्मि देसाईनं देवोलिनाच्या कानशिलात लगावली.

बिग बॉस १५ चा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रश्मि आणि देवोलिना यांच्यात टास्कदरम्यान झालेलं भांडण. ‘तिकिट टू फिनाले’ हा टास्क जिंकण्याच्या नादात रश्मि आणि देवोलिना यांना त्यांच्या मैत्रीचाही विसर पडलेला दिसत आहे. एवढंच नाही तर टास्क जिंकण्यासाठी या दोघी एकमेकांशी भांडताना आणि मारामारी करताना दिसल्या.

घरातील सदस्यांसाठी व्हीआयपी झोनमध्ये जागा मिळवण्यासाठी ही शेवटची संधी आहे. रश्मि आणि देवोलिनापैकी कोणालाच ही संधी गमवायची नाही. दोघीही राखीला आपापल्या बाजूनं निर्णय देण्यास सांगतात. पण राखी त्या दोघींमध्ये भांडण लावण्याचं काम करते. विशेष म्हणजे राखी यात यशस्वी होते. रश्मि आणि देवोलिनामध्ये जोरदार भांडण झाल्याचं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. एवढं नाही तर या दोघांचं भांडण पुढे जाऊन एवढं वाढतं की रश्मि रागाच्या भरात देवोलिनाच्या कानशिलात लगावते.

दरम्यान ‘तिकिट टू फिनाले’ टास्कमध्ये राखी, देवोलिना आणि रश्मि यांच्यापैकी कोणाच्या बाजूने निर्णय देते हे येत्या एपिसोडमध्येच कळणार आहे. पण रश्मि आणि देवोलिनाचं भांडण मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. आता बिग बॉस रश्मिच्या या वर्तनावर तिला काय शिक्षा देतात याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss 15 rashmi desai slap devoleena bhattacharjee between task mrj

ताज्या बातम्या