Bigg Boss 19 House Tour : लोकप्रिय टेलिव्हिजन रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन येत आहे. या वेळीही अभिनेता सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. गेल्या काही सीझनप्रमाणे या वेळीही हा शो मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये शूट केला जाईल. या सीझनची तयारी प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता ओमंग कुमार यांनी केली आहे.

घरात सुमारे १०० कॅमेरे बसवले आहेत, जे स्पर्धकांच्या प्रत्येक कृतीचे सतत रेकॉर्डिंग करतील. शोचे प्रोजेक्ट हेड अभिषेक मुखर्जी यांनी या घराशी आणि थीमशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. यावेळी या खास गेममध्ये बरेच बदल दिसणार आहेत. दरम्यान, आता निर्मात्यांनी ‘बिग बॉस’ घराची पहिली झलकदेखील लोकांना दाखवली आहे.

अनेक ठिकाणी ‘बिग बॉस’चे घर दरवर्षीइतके प्रेक्षकांना प्रभावित करू शकले नाही. कारण- यावेळी ते खूप साधे ठेवण्यात आले आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला ‘बिग बॉस हाऊस’चे फोटो दाखवतो.

केबिन इन द वुड्स थीम

क्रिएटिव्ह टीमच्या मते, यावेळी घराची डिझाईन ‘केबिन इन द वुड्स’ म्हणजेच जंगलात बांधलेल्या लाकडी घरासारखी करण्यात आली आहे. क्रिएटिव्ह हेड रोहन मंचंदा म्हणाले की, घरात प्राण्यांची अनेक चिन्हे ठेवण्यात आली आहेत. त्याबरोबरच यावेळी एक ‘असेंब्ली रूम’देखील बनवण्यात आली आहे, जिथे सर्व प्रमुख निर्णय घेतले जातील.

गार्डन आणि लिव्हिंग रूम

यावेळी गार्डन एरिया मोठा आहे; पण तिथे बऱ्याच गोष्टी विखुरलेल्या दिसतात. आजूबाजूला वेगवेगळे फर्निचर ठेवण्यात आले आहे. जिमचा परिसरही गेल्या हंगामापेक्षा लहान आहे. दुसरीकडे लिव्हिंग रूम अ‍ॅनिमल मोटिफ्सनी भरलेली आहे. स्वयंपाकघराच्या वर पोपट आणि कन्फेशन रूमच्या दाराच्या वर बैलाचे डोके आहे.

स्वयंपाकघर आणि बेडरूम

यावेळी स्वयंपाकघर लहान आणि लिव्हिंग एरियाशी जोडलेले दिसते. बेडरूम आरामदायी दिसते आणि त्याला एक विंटेज टच आहे. यावेळी घरात सिंगल बेड नाही, त्याऐवजी फक्त डबल बेड आणि ट्रिपल बेड आहे.

असेंब्ली रूम आणि बाथरूम

या सीझनमधील असेंब्ली रूम हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे, जिथे स्पर्धक सर्व प्रमुख निर्णय घेतील. बाथरूमचा परिसर जवळजवळ मागील सीझनसारखाच आहे. फक्त तेथील रंग पॅलेट आणि वॉलपेपर बदलण्यात आले आहेत.

जेल नाही; पण सीक्रेट डोअर आहे

सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे यावेळी घरात जेल नाही. स्पर्धकांना शिक्षा देण्यासाठी इतर पद्धतींचा अवलंब केला जाईल. इतकेच नाही, तर यावेळी घरात ८-१० सीक्रेट डोअरदेखील बनवण्यात आले आहेत.

‘बिग बॉस १९’ २४ ऑगस्ट रोजी प्रसारित होत आहे. प्रेक्षक प्रथम तो ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर पाहू शकतील आणि त्यानंतर तो ‘कलर्स’वर येईल.