‘बिग बॉस ओटीटी’ चा पहिला सिझनचा महाअंतिम सोहळा काल रात्री पार पडला. या शो च्या पहिल्या सिझनच्या विजेत्या पदावर अभिनेत्री डान्सर दिव्या अग्रवाल हिने आपले नाव कोरलं आहे. सध्या दिव्या तिचा हा आनंद तिचा बॉयफ्रेंड वरुण सूद आणि जवळच्या मित्र -परिवारासोबत साजरा करत आहे. या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘बिग बिस ओटीटी’ च्या घरातून बाहेर येताच बॉयफ्रेंड वरुण सूदने तिच्यासाठी खास केक मागवला होता. वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. या व्हिडीओत दिव्या सोफ्यावर बसली आहे आणि वरूणने तिला घट्ट मिठी मारली आहे. दोघेही मिळून केक कट करत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दिव्याने या व्हिडीओत केशरी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे तर वरुणने काळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

दिव्या अग्रवालचा खास मित्र रणविजय सिंहने देखील त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिव्या अग्रवाल खूपच आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच ‘बिग बॉस ओटीटी’ची ट्रॉफी देखील दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने दिव्याला वोट केल्याबद्दल सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दिव्याने ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये विजेतेपद पटकावत ट्रॉफीसह २५ लाख रुपये रक्कम जिंकली. तर या शोमध्ये निशांत भट्ट रनरअप ठरला असून शमिता शेट्टी तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. प्रतीक सेजपाल हा ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरातून बाहेर पडून ‘बिग बॉस सिझन १५’ च्या घरात जाणारा पहिला कंटेस्टंट ठरला आहे.